पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७५)

त्यास भेटण्यास गेला होता. त्यामुळे बंगळूर येथे आल्याबरोबर त्याने पुन्हां युद्धाची तयारी केली; व सर्जेखानासह तो बेदनूरकरावर चाल करून गेला; व पुन्हां उभयतांमध्ये अनेक युद्ध प्रसंग झाले. तथापि अखेरीस शहाजीनें त्याचा पूर्ण पराभव करून त्यास अगदर्दी जेरांस आणिलें; तो दीन झाला; शहाजीस शरण आला; त्याने विजापूरकरांचा बळकविलेला सर्व प्रदेश सोडून दिला; व त्या नंतर त्यास एक लहानशी जहागीर बहाल करून आदिल- शाहाचा अंकित करून ठेवण्यात आले. " हे वृत्त विजापुरीं कळल्यावर आदिल- शहा बहुत संतोषी होऊन मोठे मरातबांनी पत्र, वस्त्रे, भूषणे अलंकार, हत्ती, घोडें सुद्धा पाठवून, सर्व अमीर उमराव यांनी तारीफ करून आपापली इकी- गत स्नेह वादाची लिहून, गौरव केला. फत्ते झाल्यामुळे येथून कूच करून दुसरी ठाणीं बखेडेदार होती, त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून तुंगभद्रातीरी बेदिकरें ऊर्फ बसवपट्टण + येथे आले. तेथे अनेक श्वापदें उत्पन्न झाली; राजांस शिकार करावयाची इच्छा होऊन, घोड्यावर स्वार होऊन हरणाचे पाठीस लागले. ईश्वरेच्छा, त्या योगे घोड्याचा पाय भंडोळीत अडकून,घोडा च राजे एकावच्छेदें, पडले; " त्यांत डोक्याच्या कवटीस जखम होऊन ते गतःप्राण झाले. (शके १५८५ माघ शुद्ध षष्ठी, शनीवार रोजी इ० सन १६६४ ज्यानेवारी). मागाहून लोक माणसें आली; व्यंकोजी जवळ नव्हता, सबब भडाझि दिला. व्यंकोजी राजास डाकेने तेथे आणविले; त्यांनी उत्तर- क्रिया सांग केली. आदिलशाहाकडून दुखवट। येऊन मनसबदारीची वस्त्रे व्यंकोजींच्या नांवे झालीं. मृत्यूसमयी शहाजीचे वश ७० वर्षांचें होतें; व शिवाजीनें सुरत है शहर लुटल्याची बातमी त्यास नुकतीच मिळालेली होती. कर्तव्य करीत असतां, मृत्यू येणें है। खरोखर मोठीच ईश्वरी कृपा होय. अर्थात् दुखण्याबाइण्यानें व हालयातनेनें खितपत न पडत वीर पुरुषाला


 + हे ठिकाण म्हैसूरच्या राज्यांत, शिमोगा जिल्ह्यांत, हरीहरच्या दक्षि- गैस अजमायें चाळीस मैलावर आहे. सोळाव्या शतकांत पाळेगारांमधील तारिकेरे या नांवाचें घराणे या ठिकाणी अंमल चालवांत होते. येथे त्या काळचा एक किल्ला असून तो हल्ली मोडकळीस आलेला आहे.