पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७६)

उचित असाच मृत्यू ह्या पुण्यश्लोक नरशार्दूल शहाजी राजास आला हेंही खरोखर त्याच्या पुण्याईचें, मालोजी राजे यांच्या परोपकारी बुद्धीचें, व ईश्वरी श्रद्धेचें आणि परमेश्वराच्या पूर्ण कृपेचें फल होय. शहाजी राजाच्या मृत्यूस परंपरेनें कारणीभूत झालेल्या ह्या बेदनूरकरांचा शिवाजीनें पुढें चांगलाच बंदोबस्त केला; व पुढील काळांत त्या भागांत त्यानें जलमार्गानें सफर केली, त्यावेळी बेदनूरकरांना शरण येणे भाग पाडिले; आणि "आम्ही दरसाल आपणांस तीन लक्ष होन खंडणी देत जाऊं " असे त्यांनी कबूल केल्यानंतरच त्यांची शिवाजीच्या तडाक्यांतून मुक्तता झाली.

 शहाजीच्या अकस्मात् मृत्यूची दुःखद वार्ता ऐकून " शिव जी राजे यांनी बहुत शोक केला; सर्वही विधान करून दानधर्म अपार केले; आणि बोलले कीं,मजसारख्या पुत्राचा पराक्रम ( शहाजी ) महाराज पाहते तरी उत्तम होते. आपण आपला पुरुषार्थ (आतां) कोणास दाखवावा ? मार्गे अफल- लखान मारिला, व शास्तेखानास शास्ती ( शिक्षा ) केली; पराभवातें पावविला; ते पराक्रमाचें वृत्त ऐकून महाराज (शहाजी राजे) संतुष्ट झाले;+ समाधानपत्रे आपणांस वरचेवर येत होती; तैशींच अलंकार वस्त्रे पाठवीत होते; या उपरी त्या मागे आपणांस कोणी आतां वडील नाहीं, ' म्हणून बहुत खेद केला. " मातोश्री जिजाऊ आईसाहेब हिच्यावर तर शहाजीच्या निधनानें आकाशच कोसळलें ! तिचा शोक अनावर झाला ! ती सती जाण्यास सिद्ध झाली; तिनें अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला. तेव्हां तर शिवाजीच्या हृदयानें ठाव सोडला ! “वडील गेले, मातुःश्रीही जाणार, " ह्या विचाराने शिवाजीस अत्यंत दुःख झालें; त्याच्या मनाची कालवाकालव झाली ! युद्धक्षेत्रांत चमकतांना,


 + शिवाजीच्या चरित्रांतील कांहीं आख्यानें जयराम कवीच्या मुखानें शहाजी व व्यंकोजी या उभयतांनी बंगलोर (बेंगरूळ ) येथें गौरीविलास सभेत ऐकिलीं, आणि शहाजीच्या मृत्यूनंतर व्यंकोजीनें व इतर राजवंशीय मंडळींनी याच कवीची आणखी कांहीं काव्ये ऐकिलीं, असा " पर्णालपर्वत- ग्रहणाख्यान " या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे.