पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८४)


तेंः -- " लग्नविधी करावया कारणें तुम्हांस व तुमचे मातेस हुजूर बोलाविलें, त्यावरून तुम्ही येऊन अर्ज केला जे सांप्रत आपणांसी रोजीचे खावयास नाहीं. आणि लग्नविधी कैसी होईल, त्यावरून तुम्हांवरी मेहेरबानी करून लुगड्याबद्दल दोन पंचवांस व ऐन जिन्नस सामान पांचशे माणसांचा, ऐसे बक्षीस दिधलें असे; सुखें घेऊन अलबत्ता लभ सिद्ध करणे " यावरून लोकांचा परामर्ष घेण्याची जिजाबाईची दक्षता निदर्शनास येते.+

 शिवाजीच्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच त्याच्या खाजगीकडील कारभाराचीहो ठरीव व मोठी नमुनेदार व्यवस्था असे; आणि मातुःश्रीच्या व्यवस्थेत तर तिळमात्रही कमी पडूं न देण्याविषयी शिवाजी अतीशय काळजी घेत अस. शिवाजीने तिच्या सेवेंत दक्ष व हुषार माणसें व बायका नेमून दिल्या होत्या. तिला स्वतंत्र नेमणूक असून पाहण्याचे शिपाई, पुजारी, पुराणीक वगैरे मंडळीची तिच्याकडे स्वतंत्र नेमणूक करून दिली होती; त्याप्रमाणेच दान- धर्माचीही स्वतंत्र व्यवस्था केलेली असून, एक दिवाण, एक चिटणीस, एक फडणीस, व एक पोतनीस इतके कामगार, व कारकून मंडळी तिच्या

 +राजे शहाजी याची पत्नि, व संभाजी व शिवाजी यांची माता जिजाबाई ऊर्फ जिजाई हिच्या संबंधानें जयराम लिहितो की:-

जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई । भली शोभली ज्यास माता जिजाई ||
जिचे कीर्तिचा चंबु जंबुद्विपाला । करी साउली माउलीसी मुलाला ||१३१||

 जिजाई ही शहाजीसारख्या धीर, उदार व पराक्रमी पुरुषाला चांग लीच साजण्यासारखी बायको होती. आणि ती केवळ नवऱ्याच्या कोतींवर विकत नसून, स्वतःच्या धार, उदार व गंभीर वृत्ताने तिची कीर्ती त्या काल सर्व भरतखंडभर पसरली होती; इतकेच नव्हे तर तिच्या कीर्तीच्या चंबू- खाली म्हणजे घुमटाखार्ली, म्हणजे घुमटाच्या सावलीखाली सर्व जंबु- द्वीप म्हणजे जंबुद्वीपांतील सज्जन लोक यवनांच्या जुलमाला कंटाळून आश्र- यार्थ येत असत; अर्से जयराम लिहितो. ( रा. मा० वि० चंपू ) यावरून ही बाई किती तोलाची होती, कर्तबगार होती, गोरगरिबांचा समाचार घेणारी व गुणी सज्जनांना आश्रय देणारी होती, याची सद्दज कल्पना करिता येते.