पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८८)


करी. इतक्यांत दरवेशी एखाद दुसरा सिंहाचा बच्चा, व थट्टी कामदार एखादा माजलेला पोळ राजापुढें नाचत बागडत आणीत. नंतर हंस, चाष, मत्स्य, यांचे शुभशकुन घेत घेत व दरवाजावरील तोरणाकडे पहात पहात वाड्यापाठीमागील अश्वत्थ, औदुंबर वगैरे शुभवृक्ष व पारिजातकादि पुष्पवृक्ष यांच्या छायेखालून राजा जाई. शेवर्टी दक्षिणावर्त शंखांतल्या तीर्थांचा नेत्रांना स्पर्श करून व वेळूच्या लंबायमान दांडयाच्या अग्रावर लटकत व फडफडत असलेल्या जरिपटक्याकडे सकौतुक दृष्टिक्षेप चढवून, राजा नाडो परीक्षणार्थ आपला हात राजवैद्यापुढे करो. सवेंच एक ब्राह्मण एका हातांत तेलानें भर- लेली रुप्याची परात, व एका हातांत तुपानें भरलेली सोन्याची परात राजा- पुढे आणी त्यांत मुखाचें प्रतिबिंब पाहून व अष्टोदशें मंगलांचा शुभशकुन घेऊन राजा स्नानोपहारादि सेवन केल्यावर सभामंडपांत प्रवेश करी. सभा- भंडपाला ऊर्फ दरबाराला मवगजी असें नांव असे. या नवगजीत राजे, उप- राजे, संस्थानिक, परराष्ट्रीय वकील व सरदार आधींच येऊन हजर असत. पंडित, कवि, शास्त्री, वैदिक इत्यादि सरस्वती पुत्रांचाहि समुदाय राजदर्श- नाची उत्कंठने वाट पहात असे. नंतर भालदारांच्या ललकायत व जन- संमदांतून वाट काढीत येणाया चोपदारांच्या ठणकाऱ्यांत महाराज हातांतील तरवारांचे अग्र जमिनीला टेंकीत टेंकीत ( कारण शहाजी महाराजांचें वय ह्या काली साठीच्या पुढे गेलें होतें. ) सभास्थानांत गंभीर रुबाबानें प्रवेश करून सिंहासनारूढ होत. हा प्रातःकालीन कार्यक्रम झाला. भोजनोत्तर दोन प्रहरानंतरहि कर्धी कर्धी स्वारी शिकार नसल्यास पंडित व कारभारी यांच्या सभेत बसून सायंकाल पावेतों राजकारण, ब्रह्मचर्चा, काव्यविनोद, दानधर्म, पंगुपरामर्ष, न्यायमनसुबा, जेठीमल्ल युद्धे इत्यादि लघु किंवा जड •व्यवहारांत महाराज गुंतलेले असत. सायंकर्म आटोपल्यावर उपहारोत्तर खल- बतखान्यांत शेलक्या मुत्सद्यांच्या समवेत गुप्त कारवाई चाले, " अशी हो शहाजी महाराजांची दिनचर्या जयरामानें वर्णन केलेली आहे, व त्यावरून शहाजीच्य ऐश्वर्याची पुष्कळच कल्पना होण्याजोगी आहे.

 शहाजी राजा हा स्वतः विद्वान् असून त्याला संस्कृत प्राकृत व इतरही अनेक भाषांचे ज्ञान होतें; व शहाजीनें जयराम कवीला " शतचंद्रं नभस्तलं "