पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)

संबंधानें आम्ही कडक नियम पाळीत असतां, भोसल्यांच्या कुळासंबंधानें तीनशे वर्षे जर सारखी सर्वांची व विशेषतः त्या घराण्यांची एकवाक्यता आहे, आणि सर्व बखरकार व कागदपत तीच ग्वाही देतात तर हा प्रकार भरपूर पुराव्याशिवाय खोटा मानता येणार नाही. " शिवाय इतर कित्येक प्राचीन मराठयांच्या घराण्याप्रमाणेच, भोंसले हेही उत्तरेकडून दक्षिणत आलेले मूळचे रजपूत आहेत, याविषयी आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे हा आहे कीं, खुद्द शहाजी यानेंच एके ठिकाण ( श्री सांप्रदायिक विविध विषय; पृष्ठ २११ पहा.) आपण रजपूत लोक " असें स्वतःविषयीं म्हटले आहे; व त्यावरून भोंसले हे मूळचे रजपूत आहेत, ही गोष्ट निर्विवाद सिद्ध होत आहे. त्याप्रमाणेंच पूर्वी मल्हार भट या नांवाचा एक विद्वान ब्राह्मण या भोसले घराण्याचा, मालोजीच्या काळापूर्वी, उपाध्या होता; त्यानें आपल्या यजमानाचा उत्कर्ष व्हावा म्हणून स्वतः उदेपूर x येथे जाऊन पुष्कळ खटपट केली होती; असा असा उल्लेख आढळतो; त्यावरून मालोजीच्या पूर्वीच्या काळापासूनच उदेपूर येथे आप- गांस राज्य, नाहीं तर निदान वतन अथवा जहागीर मिळेल, व आपणांस राजकीय महत्व प्राप्त होईल, असे भोंसले घराण्यास वाटत असून, त्यासंबध त्यांची खटपट सुरू होती, हे सिद्ध होतें. आणि भोंसले घराण्याचा उदे- पूरच्या राजघराण्याशी अगदी निकटचा संबंध असल्याबद्दल खात्री पटते; शिवाय “राधामाधवविलासचंपू " ह्या प्रसिद्ध, महत्वाच्या व मननीय काव्यग्रंथांत जयराम कवी हा शहाजीचें अडनांव ऊर्फ कुलनाम " भोंसले " अर्से देऊन वंशनाम शिसोदिया देतो; तेव्हां शिवाजोच्या राज्यारोहणकाली


पराक्रम गाजविला; त्यामुळे शाहू महाराजानें खूष होऊन त्यांना देवास व घार हे दोन प्रांत दिले व त्यावेळेपासून हे परमार ऊर्फ पवार घराणे नर्मदा नदीपलांकडे उत्तर हिंदुस्थानांत स्थाईक झाले.

 Xउदेपूर, मेवाडची राजधानी; खांडवा - अजमीर रेल्वेवर आर. एम्. सेक्शन ) चितोडगड या नांवाचें एक रेल्वेस्टेशन आहे, तेथून या शहरापर्यंत आगगाडीचा फांटा नेलेला आहे.