पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८९ )

ही समस्या स्वतः घातली, राधामाधव विलास हा संस्कृत चंपू सहृदयेनें श्रवण केला, व बारा भाषांत लिहिलेली पद्ये सरसतेनें श्रवण केली, यावरून तो विद्वान व बहुविध भाषाभिज्ञ होता, बहुविध विद्यांचा व काव्यांचा भोक्ता होता, असे स्पष्ट होते. शहाजीच्या आश्रयाला नाना देशचे संस्कृत, व प्राकृत कवी, पंडित, शास्त्री, मराठी शाहीर इत्यादि गुणी मंडळी असून तो अशा विद्वान् मंडळींचा नेहमीच उत्तम प्रकारें परामर्ष घेत असे, कोणी कोठचाहि कवि आश्रयार्थ आला म्हणजे शहाजी राजा त्याला त्याच्या इच्छे- प्रमाणे आदरानें ठेवून घेत असे, आणि तो जे ईश्वरविषयक, किंवा राज- विषयक, किंवा मनोरंजन विषयक कवित्व त्याच्या जन्मभाषेंत करी, तें ऐक- ण्यांत फावला वेळ घालवून तो आपले मन रिझवीत असे. शहाजी राजास गोवर्धनाचार्यकृत सुप्रसिद्ध आयी फार आवडत, त्यामुळे राजाच्या सांगण्या- वरून हुबेहूब गोवर्धनाच्या आयेंसारख्या आर्या जयशमानें रचून दाखविल्या व शाबासकी मिळविली, असा चंपूंत उल्लेख असून, काव्यशास्त्र विनोदानें धीमान् शहाजी महाराजाचा काळ कसा जात असे, त्याचेंही कवीनें चंपूच्या आठव्या उल्लासांत सुंदर वर्णन केलेले आहे. जयराम कवोच्या वडिलाचा व शहाजीचा परिचय एवढ्याच कारणावरून जयराम कवी शहाजीच्या भेटीस गेला नाही, तर बंगळूरच्या शहाजी महाराज भोसल्यांच्या कर्णोपम दातृत्वावर देशोदेशींच्या अनेक विद्वानांचा योगक्षेम चालतो अशी वदंता चारणांच्या तोंडून ऐकून " जयराम कवी राजाच्या भेटीस व आश्रयाच्या इच्छेनें कर्नाटक प्रांत गेला, व तो विद्वान् असल्याबद्दल शहाजी राजानें स्वतः व आपल्या दरबारांतील विद्वान् मंडळीमार्फत खात्री करून घेतली, व नंतर त्याचे नांव गांव वगैरेची खात्री करून घेऊन, व " हा कोणी दूरचा नाहीं, आपलाच आहे, " असे म्हणून त्यास आपल्या आश्रयाला ठेवून घेतलें, असें चंपूंत वर्णन आहे, त्यावरून शहाजी राजा विद्याविलासी, गुणि- जनसंग्रहों व विद्वज्जन आश्रयीं होता, आणि त्याच्या कर्णांसारख्या दातृत्वावर देशोदेशींच्या अनेक विद्वानांचा योगक्षेम चालत होता, हे उघड होतें.

 शहाजीच्या खास दरबारांतील दरबारी व कारभारी मंडळी, पंडित व कवी मंडळी, ( आणि युवराज संभाजी वगैरे खाशी मंडळी ) मिळून एका-