पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९४)

 ( ३३ ) कमलाकर:- हा यशवंतराव श्रीकरणाधीश याचा आश्रयदाता; याचे उपकार यशवंतरावानें योग्यतेस चढल्यावर फेडले; हे नांव किंवा उप- नांव आहे ते समजत नाहीं; पूर्वपरिचित नाहीं.
 ( ३४ ) कोयाजीराजे भोंसले:- हा शहाजीचा रक्षापुत्र; ह्याच्यावर व्यंकोजी राजाची फार कृपादृष्टि असे; हा कोयाजी राजा नृत्य, गायन, संस्कृत प्राकृत जाणणारा असून घोड्यावर बसणे, भालाबर्ची खेळणें, कुस्ती- कवायत करणे, इत्यादि कलांत निपुण होता. त्यानें संस्कृत प्राकृताचा अभ्यास विश्वनाथ ज्योतिषाजवळ केला असून, तो मल्लविद्या नरषट्कसा या नांवाच्या प्रख्यात जेठीपाशी शिकत होता; काव्य, नाटक, आख्यायिका, इतिहास, संगीत, नाना देश भाषा, इत्यादींच्या परिज्ञानांत त्यानें अत्यंत कौशल्य संपादिले होतें. या कोयाजी राजाला नायकीण या नांवाची एक मुलगी होती, तिला गायन नर्तनाची तालीम कांहीं कवीश्वर देत असत. नांव पूर्वपरिचित नाहीं.
 ( ३५, ३६ ) त्रिमल्ल नाईक, व वेंकट नाईक :- हे उभयतां शहाजीच्या दरबारचे प्रख्यात कानडे गवई; नावें पूर्वपरिचित नाहीत.

 ह्रीं छत्तीस नावें शहाजी महाराजांच्या खास दरबारांतील कारभारी मुत्सद्दी, पंडित, व कवी, यांची आहेत. ह्या छत्तीस मंडळीपैकी बहुतेक सर्व संस्कृत व प्राकृत जाणणारे असून कित्येक तर पट्टांचे शास्त्रश व कलाभिश होते; याशिवाय मराठी, ब्रज, गुजराथी, बख्तर, ढुंढार, पंजाबी, हिंदुस्थानी, बागलाणी, फारशी, उर्दू, व कानडी, अशा अकरा भाषांतील पसतीस कवी शहाजीच्या आश्रयाला होते; त्यांची नांवें (जयराम कवीशिवाय) खालीं लिहि- ल्याप्रमाणें:-
 ( ३७ ) रघुनाथ व्यास:- माहिती नाहीं. बैरनके वधू फिरे बेरनके बनमे, अशी समस्या रघुनाथ व्यासानें जयराम कबीला घातली; तिचें पूरण करतांना शहाजीचा रणदुंदुभी वाजला असतो शहाजहानच्या हृदयांत घडकी भरली, असे विधान केले आहे.
 (३८) रघुनंदन:- हा ब्रजभाखा कवी; याच्या समस्येच्या उत्तरांत जय- रामानें बालकृष्ण वर्णन केले आहे; शहाजीचा उल्लेख नाहीं.