पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९७)

आहे. ) तो पुढे म्हणतो:- शहाजीची छाप गोवळकोंडा व श्रीरंगपट्टण या प्रांतावर बेमालुम बसली, व कर्नूळ वगैरे कर्नाटकांतील बहुतेक प्रांत शहा- जीच्या हाती आले. ह्या काली महंमद अदिलशहाची सर्व मिस्त शहाजी- महाराजावर होती. शहाजीजवळ त्या काळी साठ सत्तर हजार फौज असून अफझलखान महम्मदशाही हा अदिलशाही सरदार व शहाजहान हे त्याला वचकून असत. मोंगलाला सरहद्दीपलीकडे हांकून देऊन, सर्व दुष्मनांना जमिनदोस्त करून, व कर्नाटकांतील सर्व जमिनदार वठणीस आणून शहाजीनें महंमदशहाचें इतकें प्रेम संपादिलें कीं, तो सांवतराय या मुत्सद्यापाशीं वारंवार म्हणे कीं, “ मेरी बादशाही शहाजीनें राखी है.” ! ( या सवित- रायाच्या द्वारा शहाजी महंमदशहाशी पत्रव्यवहार करीत असे. ) शिवाय कोणाच्याही हांतून झाले नाही तें कर्नाटक जिंकण्याचे काम शहाजीनें केले, असेही महंमदशाहानें उद्गार काढिले; व सेतुबंध रामेश्वरा- पासून रुमशामपर्यंत शहाजीच्या पराक्रमाची राय पसरून गेली. त्यानंतर कवीनें पिन्गोडा उर्फ पेनकोंडा प्रांतावर शहाजीनें केलेल्या स्वारीचा उल्लेख केला आहे. तालीकोटच्या ( राक्षस तागडीच्या ) युद्धानंतर विजयानगरचे राजे पिन्गोड्याच्या किल्ल्यांत रहात असत, व त्या काली तो किल्ला कर्नाटकां- तील दुर्भेद्यातील दुर्भेद म्हणून मानला गेला होता; तो शहाजानें मोठ्या मर्दुमकानें हस्तगत करून घेतला, (व त्यानंतर तेलीचरो प्रांतावरही स्वारी केली; ) पण त्याचे श्रेय आदिलशाहाच्या दरबारी त्याला न मिळतो त्याच्या बरोबरील दुसरा सरदार यखलासखान यांस मिळाले, असे कवी म्हणतो ! म्हणजे याचा अर्थ काय १ अर्थ एवढाच कीं, मनुष्य कितही शूर असो, पराक्रम करो, कर्तबगार असो, घाडसाचें कृत्य करो, परंतु जोपर्यंत तो दुसऱ्याचा नौकर म्हणून मिरवितो, तोपर्यंत त्याचें तेज परप्रकाशितच राहतें; व त्याच्या पराक्रमाचें सर्व श्रेयही त्या दुसन्याच्याच नांवाला जाते. बापाची ही मानहानीकारक गुलामगिरी पाहून शिवाजीनें प्रथमपासूनच कोणाची ताबेदारी न स्वीकारतां तो स्वतंत्र बाण्यानें वागूं लागला, हेच शहाजी व शिवाजी यांच्या मघोल वैशिष्य आहे.

 (५१) अल्लीखान:- मुसलमान कवी; या कवीच्या समस्येस उत्तर