पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिच्छेद चवथा.
शहाजीची योग्यता.

 शिवाजी आणि शहाजी या उभयतांची तुलना करितां आली तरी अनेक कारणांमुळे तीत साम्य आढळून येणार नाहीं; कारण उभयतांचाही आयुष्य- क्रम प्रारंभापासूनच भिन्न आहे. मालोजीहून शहाजीचें कर्तृत्व पुष्कळच अधीक प्रमाणांत निदर्शनास येते; आणि मराठ्यांतील विशिष्ट प्रकारचा करारी व मानी स्वभाव मालोजी व शहाजी या उभयतांच्याही ठायीं पूर्णपणे वसत असल्याचें दृग्गोचर होतें. मालांजी, शहाजी व शिवाजी यांच्या चरित्रावरून भोसले घराण्याची कर्तबगारी, चिकाटी, दृढ़ नेश्चय, करामत व राजकारण- कौशल्य ही स्पष्टपणें निदर्शनास येतात. मराठ्यांच्या उत्कर्षाची पूर्वतयारी शहाजीनें केली; मराठा तितका मिळवून एका विशिष्ट कर्तव्ययोजनेंत आण- ण्याच्या कार्याचा प्रारंभ पहिल्याने शहाजीने केला. मलिकंबरच्या मृत्यूनंतर सतत दहा वर्षे तीन राष्ट्राशी कारस्थानें व सामने करून, शहाजीनें जीं अनेक साहसाची व शौर्याची कृयें केली, तो शिवाजीस त्याच्या भावी आयुष्यक्रमांत मार्गदर्शक झाली. शहाजीचे दीर्घ उद्योग, प्रचंड कारस्थानें व मोठमोठ्या उलाढाली, यांनी स्वराज्याचें मूर्तिमंत चित्र नेहमी शिवाजीच्या डोळ्यापुढे कायम ठेविलें. शत्रूश झगडतांना नाना प्रकारचे कष्ट सोसूनही स्वतःतील कर्तबगारीचा शहाजीस आलेला आत्मप्रत्यग शिवाजीच्या कर्तृत्वशक्तीस जोराचें चलन देण्यास कारणीभूत झाला. परंतु शहाजीचा जन्म मुसलमानी राज्यांत झाला होता; मुसलमानी राज्याच्या आश्रयानें त्याचा उत्कर्ष झाला होता; व मलिकंबरच्या मृत्यूनंतर त्याने स्वतः पुढाकार घेऊन ज्या अनेक उलाढाली केल्या- जो अनेक धाडसाचों व पराक्रमाची कृत्ये केली ती स्वराज्य संस्थापने- करितां नसून निजामशाहीचे मुसलमानी राज्य जगविण्याकरितां केली होती. तो राजे निर्माण करणारा होता; पण ते स्वराज्यांत नसून मुसलमानी राज्यांत निर्माण करणारा होता. शहाजीचें कर्तृत्व व पराक्रम हीं मुसलमानी राज्यांच्या कल्याणाकरितां होतीं. शहाजीने आपल्या जन्मभर कष्ट करून, मुसलमानो