पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०५ )

जून महिन्याच्या अखेरीस;). परंतु दोनच दिवसांनी त्याने शहाजीची प्रतिबंधातून मुक्तता केली. व कित्येक दिवसांनंतर त्यास पुन्हां अधि कारापन करून, पुढे लवकरच शहाने त्याचा जाहीररीत्या योग्य गोरव केला; व त्याची पुन्हां कर्नाटक प्रांती आपल्या जहागिरीवर परत रवानगी करून दिली. नंतर बेदनूरकर भद्राप्पा नाईक याच्याबरोबर युद्ध करून त्यांत फत्ते मिळविली; “ हे वृत्त विजापुरी कळल्यावर आदिलशाहा बहुत संतोषी होऊन मोठे मरातबांनी पत्न, वस्त्रे, भूषणे, अलंकार, इत्ती घोडे सुद्धां पाठवून सर्व अमीर उमराव यांनी तारीफ करून आपापली हकीकत स्नेह वादाची लिहून गौरव केला; शहाजी राजे याची फत्ते झाल्यामुळे तेथून कूच करून दुसरी ठाणी बखेडेदार होतीं, त्यांचा बंदोबस्त करावा, म्हणून तुंगभद्रातीरीं बेदिकरें उर्फ बसवपट्टण येथे आले; तेथें अनेक श्वापदें उत्पन्न झालों, शहाजी राजास शिकार करावयाची इच्छा होऊन, घोड्यावर स्वार होऊन हरणाचे पाठीस लागले; ईश्वरेच्छा, त्या योगें घोडयाचा पाय मंडोळीत अडकून घोडा व शहाजी राजे, एकावच्छेदें पडले; त्यांत डोक्याच्या कवटीस जखम होऊन राजे गतप्राण झाले; ( शके १५८५ माघ शुद्धषष्ठी, शनीवार रोजीं; इ० सन १६६४ जानेवारी; ). मागाहून लोक माणसें आलीं; व्यंकोजी राजे जवळ नव्हता; सबब भडाझि दिला; व्यंकोजी राजास डकेने तेथे आणविले; त्यांनी उत्तर क्रिया सांग केली; आदिलशहाकडून दुखवटा येऊन मनसबदारीची वस्त्रे व्यंकोजीच्या नांवें झाली. शिवाजीस वृत्त कळून जिजाबाई सुद्धां शोकसमुद्रां पडून बहुत विलाप केला; " जिजाबाई सती जाण्यास सिद्ध झाली; तेव्हा " शिवाजीनें तिचे मांडीवर बसून, गळा मिठी घालून आण घालून, राहविली; आपला पुरुषार्थ पहावयास कोणी नाही, तूं जाऊं नको,, असे म्हणून मोठा यत्न करून ( शिवाजी ) राजियांनी, व सर्व थोर- थोर लोकानीं राइविली; "शिवाजीस शहाजीची निधन वार्ता कळल्या- वर त्याने सांप्रदायाप्रमाणें सिंहगड येथे शहाजी राजे यांची उत्तर

[ वंशावळ पुढे चालूं]