पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०७)

आल; पण त्यास न जुमानितां त्यानें तेथची तड पोचविली. पुढे विजापूरची नौकरी घरल्यावरसुद्धां त्याच्या चित्तास स्वस्थपणा प्राप्त झाला नाही. त्याज- चर अनेक संकटें आलीं; व अनेक भानगडी उत्पन्न झाल्या. पुत्रास सामील आहे, अशा सबबीवर त्यास कैदेत पडावें लागले, तथापि सर्व संकटांपासून मुक्तता होऊन त्याच्या एकनिष्ठपणाविषयीं दरबारची खात्री झाली. आदिल- शाहांची सत्ता कर्नाटक प्रांतावर बसविण्यास या पूर्वी पुष्कळांनी खटपट केली होती; परंतु तें बिकट कार्य अखेरीस शहाजीनेंच तडीस नेलें. कनक- गीर, तंजावर, व बेदनूर येथील त्याचे पराक्रम स्मरणीय आहेत. ह्या त्याच्या पराक्रमाची तपशीलवार हकीकत आतो उपलब्ध आहे. आणि मुलाच्या वाढत्या कीर्तीपुढे त्याची कर्तबगारी अखेरीस थोडीशी लोपून गेली; नाहींतर निजामशाही सोडल्यापासून पुढील पंचवीस वर्षे त्याने पहिल्या इत काच पराक्रम गाजविला, असे दिसून येतें. शहाजीस मुसलमान सरदारांचें पाठबळ असून, त्याच्या स्वामिभक्तीबद्दल सर्वांची खात्री होती; म्हणूनच त्याच्या हांतून मोठमोठी कृत्ये शेवटास गेलीं. मुसलमान इतिहासकारांनी शहाजीविषयीं असे उद्गार काढिले आहेत की, “शिवाजीचा बाप शहाजी हा बंडखोर, फंदफितुरी, व संकटें उभी करणारा होता; परंतु तोही अली- कडे धन्याचें खाल्लेले मीठ स्मरून इमानाने व नम्रतेनें वागूं लागला. यामुळे शहाजीनें राहिलेले आयुष्याचे दिवस धन्यास ओळखून सुरक्षितपणे घालविलें" एकंदरीत शहाजीचें विजापूरकरांवर अत्यंत प्रेम होते. त्यानें शिवाजीचा विजा- पूरकरांशी तह जुळविला. तेव्हां, “ मी जिवंत असेपर्यंत तरी विजापूर- कराविरुद्ध उठू नकोस " असें शहाजीनें पुत्राजवळ मागणे मागितले होतें. शिवाजीच्या अडदांड कृत्यांबद्दल आरंभों शहाजीस वाईट वाटत असे; तरी शिवाजीची खरी कर्तबगारी ओळखिल्यावर त्याजविषयों शहाजीचे मनांत पूज्यबुद्धि उत्पन्न झालीच होती. शहाजीची व शिवाजीची भेट झाली, त्या वेळी आपले पाश्चात् व्यंकोजीचे पालन करण्याविषयीं शहा- जानें शिवाजीस सांगितले असावे; कारण तंजावरीं " परत गेल्यावर व्यंको- जीस बोलावून त्यानें आज्ञा केली की, शिवाजीनें जवांमदानें नवें राज्य मेळविले आहे. तुम्ही आमची दौलत संपादिली आहे, यांत विठोजीराजे