पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१२ )


विषय विशेष पूज्यबुद्धि वागत होती. इ० सन १६३७पासून मृत्युकाला पर्यंतचा शहाजीच्या कृत्यांचा खरा इतिहास अजून उपलब्ध नाहीं. शहा- जीचे सामर्थ्य शहाजहानच्या मानाने फारच अल्प होते; अदिलशहाच्या माननेही फारसे बरोबरीचे नव्हते; तरी ह्या बादशांना दक्षिणेतील व्यवस्था लावितांना शहाजीचा विचार करावा लागे, हें तत्कालीन इतिहासावरून स्पष्ट दिसतें. शहाजोजवळ वोसपंचवीस हजार सैन्य असल्यामुळे दोघानाही त्याची भीती वाटत होती; सन १६३७च्या पुढे शहाजीनें मनांत आणिले असते व अदिलशहानें त्याला आश्रय दिला नसता. तर अदिलश ई तील कांही प्रांत बळकावून बसण्याचे सामर्थ्य त्याच्या अंग होते; परंतु शहाजीचा स्वभाव एकदेशीय व उतावळा नसून, अव्यवस्थित पुंडरणा करण्यापेक्षां, कोणत्याही पादशहाची व्यवस्थित मनसबदारी करणे, व अब्रूनें राहणें त्याला पसंत पडलें होते जेथे जेथें तो जाई, तेथें तथें त्याचें वजन अतोनात वढत असे, व त्याच्याविषयी इतर सरदारांच्या मनांत मत्सर उत्पन्न होत असे. शिवाजांच्या


करितो " असे सांगितले; त्यावेळी रणदुल्लाखान म्हणाला, आपल्या राज्यास जो कांही अपाय आहे, तो शिवाजीमुळे आहे; शहाजीमुळे नहीं. शहाजीराजे कांहों आपल्या राज्याशीं वाईट रीतीने वागले नाहीत. कुराणांत असे वचन आहे की, ' चांगल्यास इनाम द्यावे व वाइटास शासन कर वें' ह्या धर्म- प्रमाणे पाहतां शहाजी राजास जी शिक्षा देण्याचे आपण फर्मावि आहे ती शिक्षा अन्यायाची, व रद्द होण्यास पात्र आहे." रणदुल्लाखानाचें हें भाषण एकून आदिलशहाने शहाजीस फर्माविलेली शिक्षा रद्द केली; व " शहाजा पुढे चागले वर्तन ठेवील, याबद्दल खानास जामीन घेऊन, शहाजीस विजापूर येथे बोलावून घेतलें, व नंतर त्याचा बहुमान करून त्याची मोठ्या इतमा- मानें कर्नाटक प्रांती पुन्हा परत रवानगी करून दिली; अशी इकाकत राय- रीच्या बखरीत आहे; परंतु रणदुल्लाखान हा इ. स. १६४३ मध्ये मृयु पावला; व खवासखान व मुरारपंत यांचा आदिलशाहाने इ. सन १६३६ मध्ये वध केला; अर्थात् ह्यावेळी त्यांचे साह्य शहाजीस होणेंच मुळी शक्य नव्हते, हे उघड आहे.