पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१५ )

किल्ला घेण्यास शिवाजीला लढाई करावी लागली नाही. फारसा गाजावाजा नकरितां किल्लेदाराकडे संघानें ल'वून तर कोठें लांच देऊन, कोठें धाक दाखवून तर कोठें फितू- र करून शिवाजीला हे किल्ले आपल्या हातांखाली घालतां आले. या किल्लघांत शहा- जीच्या नेमणुकांचे पूर्वीचे गडकरी लोक होते, तेच विजपुरकरांनी कायम केले होते. त्यांनी शहाजीच किल्ले वेळ आली तेव्हा शहाजीच्या मुलाला देऊन टाकिले ! कोकणचा मुलूख निजामशादीपेकों होता; तो सर करितांना शिवा जीला पुष्कदा वडिलांची पुण्याई अशीच उपयोगी पडला. आबाजी सोनदेव यानें कल्याणवर स्वारी केली तो एकदोन महिन्यांतच त्यानें तो सुभा काबीज करून परत आला सुद्धा ! सुभा म्हटला म्हणजे त्याची मुख्य जागा बरीच बंदोबस्ताची, व बळकट असते. त्या सुभ्यांत किल्ले आणि ठाणी असतात. त्यांतून सरकारी मालमत्ता सांठविलेली असते, आणि तिच्या रक्षणाकरित हजार दोन हजार तरी शिपाई ठेविलेले असतात. इतके असूनसुद्धां आबा जीनें कल्याणचा सुभा हं हं म्हणतो सर केला याचा अर्थ काय १ अर्थ इत- काच की, तिकडील किल्लयांतून व ठाण्यांतून जे लोक होते, त्यातील पुष्कळ शहाजीच्या नेमणुकीचे पूर्वीचेच होते ! " सारांश शहाजीची लोकप्रियता, युद्धकौशल्य, पराक्रम, कार्ति, व्यवहारातुर्य, व मुत्सद्दापणा वगैरे गोष्टी शिवाजीम त्याच्या भावी आयुष्यांत मार्गदर्शक झाल्या, यात काहीही संदेह नहीं.

 शहाजीच्या चरित्रावर रचिलेले एक काव्य ( राजवाडे कृत " राधा- माधव विलास चंपू " हे काव्य, पहा ) नुकतेच अलीकडे प्रसिद्ध झाले आहे, व त्याच्या प्रस्तावनेंत शहाजीच्या स्वराज्य विषयक प्रचंड खटपटी, उद्योग व कारस्थानें या संबंधी म्हणजे शहाजीचे धोरण, ध्येय, व साधनें या संबंध उहापोह केला आहे. त्यांत असे लिहिले आहे की, “शहाजी हा प्राधान्ये करून व्यवहारचतुर मुत्सद्दी होता; केवळ कल्पनातरंगावर वाहवत जाणारा शेख महंमद नव्हता. त्याच्या आधी व त्याच्या काली राष्ट्र सुधारण्याचे प्रयत्न करणारे शेख x महंमद थोडे थोडके झाले नव्हते; कली मातला


 x शेख महंमद हा मुसलमान साधू नगर जिल्ह्यांतील श्रीगोदे या गाव होऊन गेला. हा कबीराचा अवतार होता, असे मानितात. त्यास आपल्या