पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१७ )

विणारेही कांहीं वेडे निपजले. मंत्रतंत्रांनी यवनांना स्तंभित करण्याचा कित्ये- कांचा खटाटोप होता; यज्ञयागांचा व देवदेवालयांचा जीर्णोद्धार करून धर्म- रक्षण करण्यांत कित्येकांनी सर्वस्व खर्चिले, गोरक्षण करून प्रजेंत जोम उत्पन्न करू पाहणारे गोरखनाथाही देशांत वावरत होते; कथा कीर्तनें व रामायण भारतें देश भाषेत बनवून देशांतील लोकांच्या आंगी स्फुरण चढवूं पाहणारे कीर्तनकार व ग्रंथकार तर त्या काली शेकडोनें मोजावें लागत असे नानाप्रकारचे बरेबुरे उपाय जो तो आपापल्यापरी करीतच होता. परंतु असले हे उपाय तीनशे वर्षे करूनही यव- नांचे काडीमात्र कोणी नुकसान करूं शकले नाहीं. तेव्हा जो तो समाधान अर्से करून घेई कीं, बीं रुजत घातले आहे, ते योग्य वेळा रुजून त्याला फळे आल्याशिवाय राहणार नाहीत, ही भविष्यवादी विचारसरणी निरुत्तर करणारी असल्यामुळे भविष्यकाळी तिची साफल्यता अनुभवास यावयाची असल्यामुळे व भविष्यकाळाला अंत नसल्यामुळे ह्या आशेचां निराशा तीनशे वर्षे निघून गेली तरीही कधच झाली नाही. अशांतला आशावादी शहाजी नव्हता. तो पक्के जाणत होता की, यवनांचे राज्य आहे; तें हिंदूंच्या हत्यारांहून श्रेष्ठतर इत्यारांच्या जोरावर व जरभेवर चालले आहे; आणि या परदेशी अल्प संख्यांक रज्यकत्यंत आपसांतील यादवंमुळे ऐषा-


इ० सन १४६८ पासून इ० सन १४७५ पर्यंत दुर्गादेवीचा भयंकर पुष्कळ पडला होता. त्या वेळी लोकांची भयंकर अन्नान्न दशा पाहून त्याचें मन द्रवलें; व त्याने कोणत्याही प्रकारें मागचा पुढचा विचार न करितां तेथील सरकारों धान्याची कोठारें लोकांकडून लुटविली. द्दी हकीकत बादशहास कळल्यावर त्यानें दामाजीस पकडून आणविले; व त्यास विचारपूस केली. त्या वेळीं दामाजीपंतानें आपला अपराध कबूल केला. तेव्हां बादशहा त्यास शिक्षा देत असतां पंढरपूरच्या विठोबाने विठू महाराचे रूप धारण करून त्या ठिकाणी येऊन धान्याची सर्व किंमत सरकारांत भरून दिली. दामाजीचीं कांहीं पदें व कविता त्याप्रमाणेच दामाजीची हृदयद्रावक कथा, प्रसिद्ध आहेत.