पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२० )

तेचा परामर्ष घेऊं पाहणारे दामाजीपंतहि अनेक होऊन गेले. यज्ञयागांचा, व देव देवालयांचा जीर्णोद्धार करून धर्मसंरक्षण करण्यांत कित्येकानी सर्वस्व खर्चिलें गोरक्षण करून प्रजेत जोम उत्पन्न करू पहाणारे गोरखनाथहि देशांत चावरत होते. कथाकार्तनें, व रामायण भारते, देश भाषेत बनवून लोकांच्या अंगी स्फुरण चढवूं पहाणारे कीर्तनकार व ग्रंथकार त्याकाळी शेकड्यानी मोज वे लागत असे नानाप्रकारचे बरेबुरे उभय जो तो आपापल्या परीने करीतच होता; परंतु असले हे सर्व उपाय तीनशे वर्षे करूनहि यवना चें काडीमात्र कोणा नुकसान करूं शकले नाही. "

 " शहाजीच्या पूर्वीच्या काळाचे यथार्थ चित्र वरील अवतरणांत प्रति- बिंबित झाले आहे. पारतंत्र्याच्या पंकांत रुतलेले कोणतेही राष्ट्र प्रथम कित्येक वर्षे केवळ स्तिमित होऊन नीष्क्रिय बनतें; व त्यानंतर कल्पना तरंगाच्या ओघाबरांवर वहात जाऊन जो कोणता मार्ग यदृच्छेकरून चोखाळतां येईल तो चोखाळण्यात सार्थक्य मानू लागते. पण हे सर्व प्रयत्न विस्कळित, अंहंतु. जन्य, आणि अदूरदृष्टाचे असल्याने त्यापासून बुडत्याचा पाय खोलांत " या म्हणीप्रमाणे राष्ट्राना उद्धार होण्याऐवजी ते परदास्यांत अधिकाधिकच गुरफटले जाते. या नंतर सहकारितेचा मनु सुरू होतो; एका बाजूने राज्य- कर्त्यांचा पहिला जोम ओसरत जाऊन ते सुखास चाटावू लागतात, अणि आपली किरकोळ कामें जित लोकांच्या अंगावर टाकून चैनीत गर्क होऊन जातात. दुसऱ्या बाजूनें जित लोकांनाहि वाटू लागते की, परकी राज्याचे जोखड कांही आपल्याला सर्वस्वी झुगारून देता येत नाही; आणि ते जर आपल्या मानेवर राहणारच तर त्यांतल्या त्यांत आपल्या हाती जेवढा अधिकार लाभेल तेवढा ती नीट बजावून आपल्या देशबांधवांचे हाल कमी करावे; आणि स्वराज्याची तहान सुराज्यानें भागवून घ्यावा. शहाजीच्या पूर्वीच्या पिढी पासूनच असली सहकारितेची विचारसरणी महाराष्ट्रांत सुरू झाली होती; आणि जाधवराव, मालोजी, मुरार जगदेव वगैरे योद्धे, व मुत्सद्दा यवनाशी सहकारितां करून, साधल तेवढा अधिकार बळकावून, ग्लेच्छांच्या गांजणुकीं- तून रयतेस सोडवू पहात होते; जित व जेते यांच्या व्यवहारांत अशी वेळ