पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२२ )

कां याची मिमांसा राजवाडे यांनी केलेली नसल्यामुळे तिचें विवेचन करणे जरूर आहे. परकी संत्तशों सहकारिता करून एखादा मनसबदार कितीहि प्रबल झाला तरी त्याची धांव विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊं शकत नाही. पूर्वीच्या काळांत तो दम्र हजारी मनसबदार बनला असता, किंवा कदाचित् काबूल, बंगालसारख्या प्रांतावर सुभेदारही नेमला गेला असता; छल्लोच्या काळी त्याची उडी गव्हर्नरच्या पायरांपर्यंत किवा अंडर सेक्रेटरीपर्यंत जाऊं शकेल; पण ज्या सरकारशी सहकारिता करून त्याची सत्ता प्रबळ करण्याला मदत केल्यामुळेच आपले वैभव वाढले असतें. त्या सरकारचा उच्छेद करण्या इतकी शक्ति आपल्या मनसबदारीत येऊं शकत नाहीं. झाडावर चढून आपण - बसलेली खांदी मुळाकडून तोडल्यास त्या फांदी बरोबरच आपलाहि अघः- पात होईल, ही गोष्ट प्रथम शहाजीच्या लक्षांत आली नाहीं. निजामशाहीतून अनिघून स्वतंत्र स्वराज्य स्थापना करण्याचा त्यानें जो पहिला प्रयत्न इ० स १६२९ त केला, त्यांत त्याला असाच कटू अनुभव येऊन तो प्रयत्न चार सहा महिन्यांतच आटोपला. पुढे चार वर्षांनी त्यानें फिरून यत्न करून पाहिला, व त्याचीहि गति तीच झाली. त्यानंतर विजापूरच्या अदिलशहाशी उघड वैर करण्याचे टाकून, कर्नाटकात अदिलशाहीच्या नांवावर मांडलिकी राज्य स्थाप- नेचा त्याचा तिसरा प्रयत्न बराच सफळ झाला. "

 “ यावरून हेच सिद्ध झाले की, ज्याचें बहुतेक सर्व आयुष्य सहकारित गेले, व ज्याच्या वैभवाचा उगम सहकारितेतच झाला, त्याची उडी मांड- लकी संस्थानाच्या पलीकडे जाऊं शकत नाहीं. याला कारणेही तशीच "नैसर्गिक असतात. एक तर असल्या मनसबदारांचें तेज सूर्यासारखें स्वयं- प्रकाशित नसून चंद्रासारखें प्रतिबिंबित असते; त्यामुळे सूर्याचें तेज अड विण्याचा चंद्राने यत्न केल्यामुळे, सूर्याला खग्रास ग्रहण लागले तरी त्या- बरोबर चंद्राच्याही तेजाचा लोपच होतो. तशीच स्थित राजकीय वैभवाच्या झगड्यांतही घडून येते; दुसरें कारण असे कीं, दुर्बल राजाची पेशवाई, किंवा सरलष्करी करता करतो त्याला हळूच ढकलून देऊं इच्छिणाऱ्या स्वरा ज्यसंस्थापकावर कृतघ्नतेचा व स्वामिद्रोहाचा आरोप येतो; याचा परिणाम पारलौकिक किंवा नैतिक सुखदुःखांतच दिसून येणारा असता, तर त्याची