पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२७ )

शिवाजीच्या पायांत सुवर्णशृंखला, किंवा लोहशृंखला घालण्याचा कावेबाज डाव पाताळयंत्री अवरंगजेबानें टाकला असता ते आव्हान स्वीकारण्यास शिवाजी डरला नाहीं, किंवा त्यांत हरलाही नाहीं. "

 " एवंच शहाजी व शिवाजी या पितापुत्रांनी आपल्या परीने स्वराज्य संपादण्याचा यावज्जन्म प्रयत्न केला. त्यांत शहाजीची मदार सहकारितेवर होती; त्यामुळे तिच्यांतील नैसर्गिक अतएव अनुल्लंघनीय दोषामुळे त्याची कामागेरी विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊं शकली नाही. शिवाजीनें आपल्या मार्गात तसली अडचण आड येऊं दिली नाही. यावरून असहकारितेचा मार्ग निष्कंटक असें मानून चालावयाचें नाहीं. सहकारितेचा मार्ग स्वल्पिष्ठ घर्षणाचा असल्यानें चोखाळण्यास निर्भय असतो, यामुळे सामान्य कर्तृत्ववान माणसें साहजीकपणेंच त्या मार्गाकडे वळतात. शिवाजीने आंखलेल्या मार्गात ठिकठिकाणी यमदूत खडे होते, तरी पण, भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही, आणि " साइसे श्रीः प्रतिवसति " या तत्वाचे त्यानें सुगम पण अल्प.. फलप्रद पंथ सोडून देऊन दुर्गम पण अतर्क्स फल देणारा, आणि केवळ स्वतःचें वैभवच कळसास चढविणारा नव्हे तर आसेतु हिमाचल हिंद राष्ट्राचा उद्धार करणारा पंथ स्वीकारिला शिवाजीचें विभूतिमत्व यांतच संकलित झाले आहे. सद्गुणानें व आशावादित्वानें रेंसभर कमी असा जर दुसरा कोणी राष्ट्र पुरूष में राष्ट्रकार्य हार्ती घेता तर त्याच्या जिवाचे न भूतो न भविष्यति धिंडवडे निघाले असते. असले दुर्घट कार्य शिवाजीनें निःशंकपणे हातीं घेतलें, आणि अल्प काळांत व स्वकीयांना आणि परकीयांनाहि स्वरूपतम दुःख सोचावयास लावून ते यशस्वी करून दाखविलें, या करितांच मुख्यतः महाराष्ट्र व पर्यायाने सर्व हिंदी राष्ट्र शिवाजीचें सदैव ऋणीच राहील, यांत शंका नाही." शहाजीच्या कर्तबगारीविषयीं विचार करितांना, तत्कालीन इतर मनसब- दार व शहाजी यांचीही तुलना केली पाहिजे. शहाजी लद्दान असतांनाच, मालोजीच्या काळांत जाधवराव हा निजामशाहीतील एक मोठा वजनदार व पराक्रमी मनसबदार होता. पुढे शहाजीच्या काळांतही दक्षिणेतील निर- निराळ्या मुसलमानी राज्यांमध्यें अनेक मराठे मनसबदार असून त्यापैकी मुरार जगदेव सारखे कांहीं तर राज्याचे आधारस्तंभ होते. या सर्व सरदारांच्या