पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३१ )

 अशा रीतीने स्वराज्य संस्थापनेच्या प्रयत्नांत दोनवेळां चांगलाच खडतर अनुभव आल्यानंतर शहाजीची पूर्वीची तडफ शिथिल झाली. सेवावृत्तींत अराजनिष्ठपणे वागल्यास त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात याचा अनुभव घेतल्यानंतर त्याच्या ठाय विचार उत्पन्न झाला. स्वतःच्या समशेरीच्या संजी- वनीत निजामशाही जिवंत करण्याचें सामर्थ्य असले, तरी ती कायमची जिवंत ठेवण्याचें सामर्थ्य तींत नाहीं, हा कटु अनुभव त्याला आला, आणि नाइलाजानें त्याला आदिलशाहाची नौकरी पत्करावी लागली. ज्यांच्याशी आपण दोन हात केले, प्रसंगी बरोबरीच्या नात्यानें व्यवहार केला, त्यांनी शहाज्जीला दुखविलें असूनही, त्याला त्यांचा उच्छेद करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळे अपमानाच्या यातना नाइलाजानें गिळून टाकाव्या लागल्या; इतकेंच नाही तर स्वतःची इभ्रत, अहंकार, इज्जत, महत्वाकांक्षा, कर्तृत्वशक्ति व अभिमान यांना उघड्या डोळ्यांनी फारकत देऊन निमूटपणें सेवाधर्म पतकरून त्याला उलट त्यांच्याच आश्रयाला राहावें लागलें. स्वराज्य संपादण्याच्या दोन्हीही प्रयत्नांत पूर्णपणे अपयश आल्यानंतर, हे ध्येय आपल्या आटोक्याबाहेरचें आहे, अशी त्याची खात्री झाली. निजामशाही किंवा आदिलशाही राज्याची नोकरी कर- तांना त्यांच्या पासूनच प्राप्त झालेल्या परप्रकाशित वैभवाच्या जोरावर आपणांस स्वराज्य संस्थापना करता येणे शक्य नाहीं, अखें त्याला पूर्णपणे कळून चुकलें; आणि त्याच वेळेपासून त्याच्या महत्वाकांक्षेचे क्षेत्रही पुष्कळच मर्यादित होऊन बसलें स्वराज्य संस्थापनेचे प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर त्या प्रयत्ना मुळे उत्पन्न झालेली आपत्ती टाळण्याकरितो सेवाधर्माची दुसरी आपत्ती शहाजीला भोगावी लागली. आपण मुसलमानी सत्तेचा प्रतिकार करूं व करूं शकूं, अशी महत्वाकांक्षी इच्छा शहाजीच्या मनांत उत्पन्न झाली; परंतु या महत्वाकांक्षेला यशस्वी करणारे दांडगें सैन्यबळ त्याच्या संग्रही नव्हतें. आपण म्हणू तेथे लष्करी लोक पाहिजे तेव्हां, व पाहिजे तितके सज्ज उभे करण्या- इतकी त्याची लष्करी सत्ता बलिष्ठ नव्हती. त्यामुळे, अपुण्या सैन्यबळाच्या आधारावरील त्याची महत्वाकांक्षा अयशस्वी ठरली, आणि कसाबसा तो या संकटांतून निभावला. त्याचवेळेपासून मुसलमान राज्यकर्त्याशी राजनिष्ठेने राहून आपणांस प्राप्त झालेले वैभव कायम ठेवणें, व शक्य तेव्हां तें वृद्धिंगत