पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३४ )

लिकी स्वराज्य" हैं प्रधान व्यंग होतें; शिवाय म्हटले तर स्वतंत्र, म्हटले तर परतंत्र अशा लिवालवित स्थितीतील तें राज्य होतें; म्हणजे आदिल- शाहाशी दोन हात करून, त्यात विजयी होऊन स्थापन केलेले तें स्वराज्य नव्हतें; हूँ शहाजीच्या स्वराज्यांतील प्रधान व्यंग होतें. शिवाय दुर्बल कर्तृ- त्वहीन, व नालायक राजाची पेशवाई किंवा सरलष्करी करता करतो, त्याला हळूच ढकलून देऊन स्वराज्य स्थापन करणान्या व्यक्तीवर कृतघ्नतेचा व स्वामिद्रोहाचा आरोप प्रतिपक्षी आणूं शकतात, व ते आरोप निमूटपणे ऐकून घ्यावें लागतात; हा न्याय पेशवा किंवा सरलष्कर यांच्या प्रमाणेच मांडलीक राज्यकर्त्यालाही लागू असतो; मूळ घन्याचें मांडलीकत्व पतकरितां पतक- रितां तें सुसंधी प्राप्त झाल्याबरोबर झुगारूग देऊन स्वराज्यस्थापना करणे, हा प्रकारही असाच स्वामिद्रोहाच्या आरोपास पात्र ठरतो; तसाच प्रकार शहाजीच्या मांडलीकी राज्याचा होता; हे त्याच्या स्वराज्यसंस्थापनेंतील दुसरे व्यंग होतें, आणि शहाजीनें स्थापन केलेले स्वराज्य कर्नाटकांत असून तें मांडलीकी स्वरूपाचें होतें, स्वराष्ट्रांत स्वतंत्र स्वराज्य नव्हतें, हे त्या स्वरा- ज्यसंस्थापनेंतील तिसरें व्यंग होतें; म्हणजे शहाजीनें कर्नाटक प्रांतांत केवढीही सत्ता स्थापन केली तरी ती परमुलुखांत व मांडलीकी स्वरूपाची असल्यामुळे ती मांड- लीकी स्वराज्य आणि प्रच्छन्न स्वराज्य या मर्यादेपर्यंतची होती प्रच्छन्न स्वराज्य किंवा स्वतंत्र स्वराज्य शहाजीनें कर्धीही स्थापन केले नव्हतें; म्हणजे भांडलीकी व प्रछन स्वराज्य हें प्रकट किंवा स्वतंत्र स्वराज्याच्या मानानें पुष्कळच कमी दर्जाचें असल्यामुळे, शहाजीनें स्थापन केलेले राज्य स्वराज्य नव्हते, असेच म्हणणे प्राप्त होते. शिवाजीच्या राज्यसंस्थापनेंत हीं व्यंगें नाहींत; तो प्रारंभा पासूनच स्वतंत्र राहिला; निजामशाही, अदिलशाही व मोंगलाई यांच्या वशिल्यावर शिवाजीनें आपली स्वराज्याची इमारत उभारली नाहीं; मुसल- मानी सत्तेचा मिघा राहून, मिळेल तेवढी सत्ता मिळवून घेऊन शहाजीनें कर्नाटकांत राज्य स्थापना केली होती; पण शिवाजीनें मनगटाचा जोर, लोक संग्रहाचा दुजोरा, स्वार्थत्यागाची परमावधी, प्रकट, मर्दुमकी, अढळ चिकाटी, असाधारण उद्योग, अण्वादकारक धाडस, वगैरे अनेक गोष्टींच्या जोरावर स्वराष्ट्रांत म्हणजे महाराष्ट्रांत स्वतंत्र राज्यस्थापना केली; अर्थात् स्वराज्य