पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३६)

आपणाप्रमाणेच शिवाजीसही भावी काळांत भोगावें लागूं नये, म्हणून त्याच्या स्वातंत्र्यप्रिय मनोवृत्तीस आळा घालून त्याची वाढ खुंटविण्याचाच त्यानें कांहींसा प्रयत्न केला, अथवा त्याला तो करावा लागला. कदाचित् ओप- चारिकहि असेल; पण असा प्रयत्न त्याने केला, हे मात्र खरें आहे. इ. सन १६४२ ४३ मध्ये, शिवाजी कांहीं दिवस विजापूर येथे शहाजीजवळ होता; त्यावेळी शिवाजीची स्वातंत्र्यप्रिय मनोवृत्ती, व तिला साजेल असें तेजस्वी वजन, हीं पाहून शहाजीस अतीशय काळजी उत्पन्न झाली. त्याने पहिल्यानें आपल्या कारभारी मंडळीकडून त्यास उपदेश करविला; आणि "आपले वडील शहाजी राजे है सेवाधर्म पत्करून व यवनांची सेवा करून एवढ्या वैभवास चढले आहेत; म्हणून यवनांचा द्वेष अथवा तिरस्कार करणे आपणांस योग्य नाहीं; आपण आतो जाणते आहांत; वडिलांची अवज्ञा आपणांकडून होऊं नये, " असे सांगविले. नंतर शहाजीनें स्वत: शिवाजीस निरनिराळ्या प्रकारें उपदेश केला. " तुम्ही मुळे अद्याप लहान आहोत; ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत त्याबद्दल विषाद मानणे, बादशहास दरबारी पद्ध- तीनें लवून कुरनिसात न करणे, इत्यादि गोष्टी बन्या नव्हेत; आम्हांस ह्या गोष्टी समजत नाहीत असे नाहीं; आम्ही जर असे वागलों असत तर आम्हास हे दिवस दिसले नसते. यासाठी देशकालानुरूप वागाल तर तुमचें कल्याण होईल; लीनतेने आर्जवपूर्वक वागाल तर राज्य तुमचें आहे; पण मागचा पुढचा विचार न करतां चालाल तर राज्यांतून हांकलून देतील, आणि मग पश्चात्ताप करण्याची पाळी येईल " असे त्यास बजाविलें; आणि " आमच्याप्रमाणेच तुम्हीही त्या दरबारी आर्जवानें व नम्रपणाने वागून आम्ही मिळविलेली दौलत पुढे चालवावी " अशी इच्छा त्याच्याजवळ प्रद- शिंत केली; शिवाय जिजाबाईसमक्ष आपण स्वतः शिवाजीस निरनिराळ्या प्रकारें उपदेश केला, व जिजाबाईस सांगून तिच्याकडूनही त्यास उपदेश करविला; परंतु त्याचा कांहीही उपयोग झाला नाहीं, तेव्हां त्यानें जिजाबाई व शिवाजी या उभयतांना पुणे येथे परत पाठवून दिले. शहाजीच्या मनांत कांहींही असो; परंतु निदान बाह्यात्कारी तरी शिवाजीशों त्याचे वरीलप्रमाणें वर्तन घडलें आहे. त्यामुळे या त्याच्या वर्तनावरून तो विजापूरकरांच्या