पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३८)

वर्तनाची दिशा बदलण्यांत जरी कित्येक वेळां स्वतःला कमीपणा आला तरी, त्यामुळे पुष्कळ वेळा आपणावरील भावी आपत्ती टळतात, हा स्वतःचा अनुभव शिवाजीच्या मनांत ठसवावा, असा त्याचा प्रयत्न होता. शिवाजीनें प्रसंग पाहून वागावें, म्हणजे त्याचे भावी आयुष्य सुखाचें जाईल, असें शहाजीचें मत होतें; म्हणजे आपले खरे विचार मनांत दावून ठेवून, कालाला बगल देऊन, प्रसंग पडेल त्याप्रमाणे वागून, राजनिष्ठ राहून - शिरजोर होऊन त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या खडतर आपत्तीच्या भोंव- व्यात न सांपडतां - आपणास सुखाचे दिवस आणून घ्यावे, व ते कायम राहतील अशाच प्रकारें राजनिष्ठेनें व सहकरितेने मागत असावें, अशी शहा. जीची मनोवृत्ती बनली होती, व त्याला अनुसरून तो स्वतः वांगत असून आपणाप्रमाणेंच शिवाजीनेंही वागावें, अशी त्याची इच्छा होती; " लीनतेनें व आर्जवपूर्वक " वागूनच त्यानें अदिलशाहीत आपले महत्व प्रस्थापित केले होतें, आणि विजापूरचें राज्य " आपलेंच" आहे, अशी त्याची भावना होती; यावरून असेही म्हणता येईल की, या भावनेंत " स्वतंत्र स्वराज्य- संस्थापना " ही कल्पनाच मुळीं उत्पन्न होत नाहीं, व या कल्पनेचा उगमही शहाजीपासून निघालेला नाहीं; त्यामुळे शहाजीनें कर्नाटकमध्ये स्थापन केलेले राज्य, हें " स्वराज्य " ह्या शब्दाच्या खन्या व्याख्येखालींच मुळीं येऊं शकत नाहीं. शहाजी शिवाजीस म्हणतो- " मागचा पुढचा विचार न करतां वागाल तर राज्यांतून हाकलून देतील, आणि पश्चाताप करण्याची पाळी येईल. " यावरून हे उघडच होतें कीं, शहाजी अद्दली घडून शहाणा झाल्या नंतर विचारी बनला; आपण अदिलशाहाशी लीनतेनें व आजैवपूर्वक वागलों नाहींतर आपली राज्यांतून हकालपटी होईल ही भीति नेहमीं त्याच्या मनांत जागृत राहिली; तो प्रसंग येऊं नये, म्हणून त्यानें अदिलशाहाशीं नेहमीं लीनतेचें व आर्जवाचेंच वर्तन ठेविलें, आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून शिवाजीनेंही आपणाप्रमाणेच वागावें, म्हणून त्यास शहाजीनें उपदेश केला; आणि शेवटीं " आम्ही मिळविलेली दौलत " तुमच्याकडे पुढे चालू रहावी, म्हणून तुम्हीही माझ्याप्रमाणेच नम्रतेने व आर्जवानें अदिलशाहाशीं वागा, असें त्यानें शिवाजीस बजाविलें. याचा अर्थ हा उघडच होतो कीं, मिळवि-