पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

 त्याकाळी, शिंदखेड हें दौलताबादच्या जवळील एक परगण्याचें गांव असून, तें मेहकर या " सरकारा" खालीं होतें; तेथील देशमूख व जोशी, या दोन्ही वृत्ति " मुळे " उपनावांच्या ब्राह्मण घराण्याकडे होत्या; व मुळे यांनी देखमुखीचे कामावर रखोराव ढोणे या नांनाच्या मनुष्यास नैमिलें होतें; हा ढोणे पुढे कांही दिवसांनी अतीशय प्रबळ व शिरजोर होऊन मालकास जुमानीनासा झाला; इतकेच नाहीं तर शेवटीं त्यानें मालकास ठार मारून त्याचें वतनाहे बळकाविलें; त्यावरून मुळ्याची बायको यमुनाबाई हो लासनेर येथें लुकजी व भुतजी या उभयतां जाधवराव बंधूकडे आली; आणि त्यांना याचना केली की, "शिंदखेड येथे माझें देशमुखीचें वतन आहे; रखीराव ढोण्या गुमास्ता, हा मुफसद ( बंडखोर ) होऊन राहज्यानी करतो, व माझे भ्रतारासमावेत मुळे ब्राह्मण जीवें मारून वतन सर्व खात आहे; तरी तुम्ही " राजे " आहांत; माझा सूड घेऊन, रवीराव ढोण्या मारून, वतन तुम्ही घ्यावें; माझे पोटों गर्भ आहे, त्याजला भटपणाची वृत्ति द्यावी, व उपाध्ये तुम्ही आपले द्यावें. ” त्यानंतर, जाधवरावांनी यमुनाबाईच्या म्हणण्याप्रमाणे तिच्यापासून एक लेख लिहून घेऊन, जालनापुराहून अडगांवास जाऊन तेथून शिंदखेडास जाऊन रात्रीं ढोणे यांचे महालांत आपले लोकांसह शिरून रवीराव ढोणे यांस ठार मारिलें; दुसन्या दिवशी गांवांतील सर्व लोकांस लखूजीनें जमविलें; व त्यांना जाधवांनीं यमुनाबाईचा लेख दाखवून त्यांची त्या बाबतीत कबूली विचारिली. शिंदखेड गांवांतील लोकही ढोण्यांच्या अमलास कंटाळलेलेच होते; त्यामुळे त्यांनी लुकजीस देशमूख म्हणून तात्काळ कबूल केलें; व त्यावेळे- पासून हैं जाधव घराणे शिंदखेड येथील देखमूख बनलें, नंतर ठरल्याप्रमाणे शिंदखेड येथील जोशीपणाची वृत्ति, व आपले उपाध्येपण जाधवरावांनी यमुना- बाईस दिलें; तें “ मुळे " घराण्यांत अद्यापि चालू आहे.

 या वेळी लुकजी जाधवरावाबरोबर निळकंठराव भानवसे या नांवाचा एक बारगीर होता; त्यानें, लुकजी व भुताजी जाधवराव या उभयतां बंधूंनी रवीराव ढोणे याच्यावर एके रात्रीं जो अचानक हल्ला करून त्यास ठार मारिलें त्या प्रसंगी, मोठाच पराक्रम केला; त्याबद्दल भानवसे यांस लुकजी ने छत्तीस गांवचा देशमुखी रुसूम दिला, व शिंदखेड परगण्यांतील शिवणी,