पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३९ )

लेली दौलत जतन करण्याची उत्कट इच्छा, व ती आपल्या हातून जाण्याची अनिवार भीति, यामुळेच अदिलशाहापासून फूटून निघून स्वतंत्र होण्याची शहाजीस हिंमत झाली नाहीं. स्वतंत्र स्वराज्यस्थापना करण्याकरितां कर्नाटक- मधील मांडलीकी जहागिरीवर पाणी सोडण्यास लागणारा प्रचंड स्वार्थत्याग त्याच्याच्यानें करवला नाहीं. शहाजीच्या ठायीं राष्ट्रीय भावना नव्हती असे नाहीं; त्याच्या ठाय प्रबळ राष्ट्रीय भावना होती; तो तेजस्वी, पराक्रमी, व कर्तबगार वीर पुरूष होता; परंतु आशेचा लोभ, व प्रखंड स्थार्थत्यागाचा अभाव, ह्या मुळे, त्याच्या ठार्थी राष्ट्रीय भावना वसत असूनही त्याला त्या भावनेला मूर्त स्वरूप देनां आलें नाहीं इतकेच नाही तर, आपणाप्रमाणेच राजनिष्ठ राह- ण्याविषयीं शिवाजीस उपदेश केल्यावांचूनही त्याच्याच्याने राहवलें नाहीं. परंतु शहाजीची ही मनोवृत्ती व विचारसरणी शिवाजीसारख्या स्वतंत्र विचाराच्या राष्ट्रपुरुषाला केव्हांही मान्य होण्यासारखी नव्हती; शहाजीच्या या विचारसरणीमुळे त्याच्या मांडलीकी राज्यांत अनेक व्यंगें राहिली; परंतु शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेंत असे एकही व्यंग नव्हते; शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेचा पाया राज्यकर्त्यांच्या मेहेरबानांवर अथवा डळमळित मांडलांकी राज्याच्या पायावर उभारलेला नव्हता; स्वतंत्रतेच्या भक्कम पाया- वर उभारलेला होता. शहाजीच्या मांडलीकी स्वराज्यांत स्वार्थ मिसळलेला होता; शिवाजीचें स्वराज्य प्रचंड स्वार्थत्यागाच्या कोनशिलेवर उभारलेले होतें.अदिलशाहाशीं मिंधेपणानें वागून स्वतःकरितां दौलत मिळविणें, मिळविलेली जतन करणे, व ती पुढील पिढीकरितां तशीच जतन करून ठेवणें, हें शहाजीच्या उत्तर आयुष्यातील ध्येय होतें; उलटपक्षी, प्रारंभापासूनच कोणाचाही मिंधा न होतां, अथवा राहतो, महाराष्ट्राचा उद्धार करण्याकरितां व महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापन करण्याकरितां प्रचंड स्वार्थत्याग करून अहर्निश उद्योग करीत रहावा, हेंच शिवाजीच्या सर्व आयुष्यभर ध्येय होतें. आपणास स्वतंत्र स्वराज्यस्थापना करता येईल, ही गोष्ट शहाजीस शक्य वाटत नव्हती; शिवाजीची, ही गोष्ट अशक्य नाहीं, अशी खात्री होती; शहाजीस, आदिलशाहाबरोबरील आपल्या नेहमींच्या व्यवहारांत, त्याला 'खावंद या घनीपणाच्या नात्यानें, नेहमींच श्रेष्ठ मान द्यावा लागत असे; शिवाजीला