पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५३ )


स्वावलंबनाच्या व आत्मयशाच्या मार्गाने महाराष्ट्रास स्वराज्य प्राप्त करून घेण्याची नुसती कल्पना सुद्धां देशांत उद्भवणे शक्य नव्हते. मुसलमान राज्य- कत्यांच्या नौकरीत राहून त्यांच्या मेहेरबानीनें प्राप्त होणाऱ्या अल्पस्वल्प फायद्यावर अथवा फार तर राजाश्रयाच्या भरभक्कम वांटणीवर तत्कालीन मराठा सरदार मंडळी संतुष्ट होती; मुसलमानी राज्यकर्त्यांच्या मेहेरबानीशिवाय इतर स्वयंभू विशिष्ट प्रकारची लायकी व कर्तृत्व आपणांत आहे, ही कल्पनाहि तत्कालीन मराठा सरदार मंडळींना झाली नाहीं; अथवा अपवादादाखल कित्येकांना झाली असली तरी राज्यकर्त्यांच्या दरायाच्या दिव्य तेजाखाली ती लोवल्याशिवाय राहिली नाहीं; शिवाय अपसांतील वैमनस्यें व विरोध, यामुळे उत्पन्न झालेल्या द्वेषा- मीला उद्दीपन देऊन आपली राजसत्ता बळकट स्थितींत कायम ठेवण्याचा मुस- लमान राज्यकर्त्यांचा प्रयत्न चालूच होता; आणि आपसांत भाकरीच्या तुक- ड्यासाठी, भांडणे लावून, तो मिळविण्यांत राज्यांतील बलिष्ठ होणे शक्य अस लेला वतनदार वर्ग परस्परांत झगडत राहिला म्हणजे आपली राजसत्ता निर्भय राहील, अशा प्रकारचे राज्यकर्त्यांचे उद्योग सुरूच होते; तरी सुद्धां, ही स्थिति बदलून व्यवस्थितपणे आत्मयज्ञ करण्यास राष्ट्र तयार होऊन मुसलमानी राज्य- कर्त्यांचें मनुष्यबळ, व द्रव्यशक्ति आटविण्याचा अट्टाहास केल्याशिवाय स्वराज्य प्राप्ती होणार नाहीं, ही कल्पना शहाजांच्या काळांत महाराष्ट्रांत उत्पन्न झाली नव्हती. "जुलमी परकीय राजांचा नाश करावयाचा म्हटला म्हणजे त्यांची नौकरी करून व विश्वास संपादून योग्य समय त्यांस गचांडी देण्याचा मार्ग जित लोकांना सदा श्रेयस्कर, सुरक्षित व न्याय्य गणलेला आहे. तो मार्ग शहा- जीच्या बापानें चोखाळून आपल्या मुलाला साफ करून ठेविला होता." पण या मार्गानें शहाजीस स्वराज्य स्थापन करतां येणें शक्य नव्हतें. झाडावर बसून, आपण बसलेली फांदी मूळाकडून तोडून, त्या फांदीबरोबरच आप- लाहि अघःपात करून घेण्यातारखा हा घातकारक प्रयत्न होता; पण यदाक- दाचित तो यशस्वी झाला असता तरी शिवाजीनें स्थापन केलेल्या स्वराज्याची योग्यता, त्या राज्यास आली नसती; व तितकें महत्व व उपयुक्तताहि प्राप्त झाली नसती. शहाजीच्या काळापर्यंत सतत तीनशे वर्षे महाराष्ट्र देश मुसलमानी