पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५९ )

कडे आले. परतून निजामशहांनी बलावितांच याकडे गेले. पुन्हां अल्ली यदलशहाकडे हि आले. ऐशा दोन तीन येरझारा जाइल्या. यवनांच्या संगतीस ते जितके दिवस होते तितके दिवस त्यांची कामें इमानानें करूनहि त्यांनां यांचे ठाई कपटच भासावयाजोगें जाहले, परंतु आपलें ह्मणून विश्वास धरा वयास स्थळ राहिले नाहीं. यवनानी यांच्या (शहाजीच्या ) हातून आपली कामे करवून घेऊन तदनुसार मान बहुमान केले, येवढेच. परंतु ' हें आपलें ह्मणून मानावयाजोगी करणी वडिलांकडून घडली नाहीं. याचे कारण हेच की थोर मनुष्यांनीं येकाची संगति घरिल्यावरी त्याशी बिगडताच नये. कदाचित बिनडावयाजोगें ( जाल्यास ) परतून त्याशी मिळू नये. हेतो प्रसिद्ध नीति आहे. त्यांतहि वडील अंगेकरून शूर आणि इमानानें वर्तले तरीहि कृत्रिमी यवनापासून वडिलांस ईश्वरें राखिलें इतकेंच. आह्मो प्रयासाने घेतल ( घेतलेला ) सिंव्हगडहि व आपण बहुत प्रयत्न करून संपादिले (संपादिलेले ) व्यंगळूर हीं यवनास सोडून देऊन साताऱ्यांत येऊन राहिले. आतां त्यास ( शहाजीस ) वृद्धाप्यदशाहि भाली. याउपरी आझास सुचल्या बुत्धीनें वागले पाहिजे. अल्ली यदलशद्दाकडे वाडे- लांनी अनेक प्रयास केले तरीहि त्यांचे चित्तांत आह्मी जड जाइलों. आह्मास तोडावें ह्मणूनच ( त्यांचें चित्तांत ) आहे. तसेंच निजामशहाचें राज्य जिंकून देवगिरीदुर्गात (दौलताबादच्या किल्लयांत ) आहे, त्या अवरंगजबासहि आह्मी येक शल्य होऊन आहों. आम्हांस तोडावें ह्मणावयाचेंच त्याच्या मनांत आहे. या दोन प्रबल शत्रूमध्ये आह्मी पुरंदरगडांत असून राज्य करावें ह्मणिजे आह्मांस कदापि साधणार नाहीं. येखादे वेळेस दगा करून आह्मांस बुडवितील. याकरितां आह्मां बाहेर निघून या दोघांसहि आवरावें तेव्हांच आमचा टिकाव होईल. हे तजवीज तुम्हसि मानते काय ?' म्हणून विचार- स्यास त्यांनी ( म्हणून शिवाजीनें विचारिलें; तेव्हां सोनोपंतांनी ) उत्तर दिल्छे जे. महाराजांनी केली तजवीज इतुकी ही खरीच प्रस्तुत महाराजांनी योजिले कार्यहि करावेंच, ईश्वरहि साह्य होईल म्हणून त्यांना (सोनोजीपंतांनीं) जबाब दिल्हा. त्यावरून महाराज शिवाजी राजे फौजेची संजोगणित्व करून ( जमवाजमव व तयारी करून ) यवनावरी राजकारणास प्रवर्तले. " या