पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६० )

लेखावरून अनेक गोष्टींचा बोध होतो. शहाजीनें बंगळून व सिंहगड आदिल- शाहास देण्याचे कबूल करून आपली प्रतिबंधांतून मुक्तता करून घेतली; परंतु आपण केले तें अयोग्य केलें, असें त्याचें त्यांसच वाटून उदास होऊन, "लामलें राज्य देखील सोडून" तो कांही दिवस सातारा येथे घेऊन राहिला होता; व त्या वेळी शिवाजी पुरंदरच्या किल्लयावर होता, असें निदर्शनास येतें. शिवाशीचा सोनोपंताशीं जो संवाद झाला, त्यावरून, शहाजीच्या निजम शाही राज्यांत "दोन तीन येरझारा" झाल्या असे कळून येतें. शहाजीनें आपल्या जन्मभर यवनांची सेवा केली, पण "हे आपले म्हणून मानावया जोगी करणी " शहाजीच्या हांतून घडली नाहीं; " याचे कारण हेच कीं, थोर मनुष्यांनी येकाची संगति धरिल्या वरी त्यासी बिगाडतांच नये" त्याचा पक्ष सोडतांच कामा नये; "कदाचित बिगडावयाजोगें जाल्यास परतून त्यार्थी मिळूं नये ” त्याच्या पक्षास पुन्हां मिळतांच कामा नये; “ हे तो प्रसिद्ध नीती आहे " पण त्या नतिीचा शहाजीनें त्याग केला; आपले वर्तन दुटप्पी ठेविलें; व त्यामुळेच " आपले म्हणून " मानण्यासारखी एकहि करणी शहा- जीच्या हांतून झाली नाहीं. तो जसा काळ, वेळ, व प्रसंग पाहून दुसन्याशीं वागत असे, तसेच दुसरेहि त्याला कामापुरते जवळ करीत असत; व काम झाल्यावर दूर लोटीत असत; शहाजीचा कोणावर विश्वास नव्हता; शहाजीवर कोणी विश्वात ठेवीत नव्हते; त्यामुळे शहाजीनें मुसलमानी राज्यांच्या कल्याणाकरितां जन्मभर, व मर मर खटपट केली, तरीहि त्याचे योग्य चीज न होतां त्यांनां "शहाजीच्या ठाय कपटच भासावयाजोगे जाइलें. " यावरून, मुसलमान राज्यकत्यांच्या नौकरींत आपली राजकीय उन्नती करून घेण्याचा शहाजीचा प्रयत्न किती व्यर्थ होता, याची शिवाजीस अगोदर पासूनच पूर्ण जाणीव होती, व म्हणूनच त्याने पहिल्यापासून स्वतंत्र राहून महाराष्ट्राची राजकीय उन्नती करण्याचे कार्य आंगावर घेतले होतें, हे उघड होतें. आदिलशाहा व शहाजहान या दोन प्रबळ शत्रूशीं टक्कर देऊन बचा- वून आपणांस स्वराज्य संस्थापना करावयाची आहे, ही गोष्ट लक्षांत ठेवून शिवाजीनें त्या धोरणानें आपला पुढील कार्यक्रम आंखला होता, ही गोष्ट शिवाजांच्या उद्गारावरून स्पष्ट होते; "शिवाजीचा सिद्धांत खरा होता