पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६४ )


इतकी पराकाष्ठा केली कीं, तो "मुसलमानी राज्यकत्यांचा प्रमुख कैवारी " म्हणून त्या काळांत गणला गेलेला होता. असे असून सुद्धां हाच 66 मुसल मानी राज्यकत्यांचा कैवारी " त्यांच्यावरच को उलटला ? आपल्या मालकीचें स्वतंत्र राज्यस्थापन करण्याचा प्रयत्न करण्याइतकी त्याची बुद्धी को पालटली? स्वतःच्या ह्या कैवारालाच नामशेष करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रसंग मुसलमान राज्यकत्यांवर की ओढवला १ अशी स्थिती को उत्पन्न झाली ? अशी स्थिती उत्पन्न होण्यास परकीय सत्ता है प्रमुख कारण, व त्यांची राज्य पद्धती व राज्यव्यवस्था, ह्यांमधील अनेक दोष, व अव्यवस्थित राज्य- कारभार, ह्रीं दुय्यम कारणें घडलेलीं आहेत. हे दोष व ही अव्यवस्था स्वतंत्र राज्य-संस्थापनेशिवाय नाहीसे करतां येणें शक्य नाहीं, अशी शहाजीची खात्री झाली; आणि इतर मराठा सरदार मंडळींच्या मानानें तो प्रखर तेजाचा वीरपुरुष असल्यामुळे त्यानें, स्वतंत्र राज्य-संस्थापनेच्या कार्यास प्रारंभ केला. संस्कृती, आचारविचार, राहणी, वगैरेशीं प्रत्येक बाबतीत जमीन अस्मानाचें अंतर असलेल्या परकीय मुसलमानी अमलाखालीं महाराष्ट्र देशाची सारखी अधोगती होत चालली होती; स्वाभिमान नाहीसा झालेला होता; आत्मविश्वास नष्ट दशेप्रत जाऊन पोचला होता; व जनता सर्व बाबतीत परावलंबी व राजाश्रयांतील वांटणीबद्दल आशाळभूत बनून आपले स्वतंत्र अस्तित्वच साफ विसरून गेलेली होती. महाराष्ट्र देश पारतंत्र्यांत खितपत पडल्याने साहजीकच निर्माण झालेल्या दुःखद व दारुण परिस्थितीचे असह्य तडाके बसत असूनही - राष्ट्राचा संसार नासला, हे उघड उघड दिसत असून सुद्धां राष्ट्रोद्धाराचे पवित्र कार्य अंगावर घेण्यास एकही सरदार पुढे आला नाही. अशावेळीं तें कार्य शहाजीनें हिंमत बांधून, मोठपा मर्दपणाने आपल्या शिरावर घेतलें, स्वःतच्या कर्तबगारीनें जनतेंत आत्म- विश्वास व अभिमान उत्पन्न करून महाराष्ट्रांतील लष्करी वृत्तीच्या मराठयांना आपणांतही राज्य मिळविण्याची, टिकविण्याची, व चालविण्याची पूर्ण लायकी आहे, असे वाटावयास लावून मुसलमानी राज्यांविरुद्ध एक नवा सांप्रदाय उत्पन्न करण्याचे महत्कार्य शहाजीनेच प्रथम घडवून आणिलें; व दक्षिणेतील शाह्यांची कमकुवत स्थिती शहाजीस पूर्णपणे माहीत असल्यामुळे त्याचा हा