पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६६ )


मानी राज्यांचे कलह, मोंगलांची त्या राज्यांबरोबरील स्पर्धा, व बाह्य राज कीय उलाढाली, स्थित्यंतरें व परिस्थिती यांचा सहजगत्या जेवढा फायद शहाजांच्या पदरांत पडावयास पाहिजे होता, तेवढा पडला होता; पण शिवाजीनें जें महत्कार्य केले, तें करण्यास शहाजाचें मन कधींहि धजलें नाहीं. शहाजीच्या काळांतील राजकीय परिस्थितीपेक्षां, शिवाजीच्या काळांतील राजकीय परिस्थितीत कांहीं प्रमाणांत फेरबदल झाला होता, असें जरी मानिलें, तरी सुद्धां बुद्धिमत्ता व साधनांची अनुकूलता शहाजीच्या काळांत कमी होती, शिवाजच्या वेळेइतकी नव्हती, असे मात्र कर्धीही ह्मणतां येणार नाहीं. तथापि शहाजीच्या काळांत पुष्कळ प्रमाणांत न्यून होतें तें श्रद्धेसंबंधानें होतें. स्वराज्य संस्थापनेचें कार्य आपल्याहातून सिद्धीस जाईल अशी परम- वधीस पॉचलेली श्रद्धा शहाजींतही नव्हती, व तत्कालीन महाराष्ट्रांतही नव्हती. शहाजच्या काळांत महाराष्ट्र देशांतील मराठयांची बहुतम संख्या मुसलमानांची सेवा करण्यांत दूषण मानण्याऐवज प्रायः भूषणच मानीत होती; मराठा वर्ग सेवाधर्मी बनलेला होता; सेवाधर्माच्या राष्ट्रघातक प्रवृत्तित मुरलेला होता; शहाजी लहानपणापासूनच मुसलमानांच्या सहवासांत व पर तंत्रतेच्या वातवरणांत वाढलेला होता. मुसलमानी राजघराण्यांवर शहाजीची भक्ति प्रारंभापासूनच विशेष होती. त्याचे स्वतःचें नांव शहाजी व भावाचें नांव शरीफजी हीं नांवें पशिवरूनच ठेविलेलीं होतीं; झणजे मुसलमानी राज- घराण, व साधू फकीर यांच्या संबंधी, शहाजीच्या जन्मकाळापूर्वीपासूनच, मालोजीच्या ठायीं श्रद्धा वसत होती; व तीच श्रद्धा शहाजीच्या मनांत वसत जाऊन पुढे ती दृढ होत होत इतक्या परमावधीस जाऊन पोचली होती कीं, इ० सन १६५६ मध्ये, ( ता० ४ नोव्हेंबर ) विजापूरकर प्रसिद्ध व सदाचारी राज्यकर्ता महंमद आदिलशाहा मृत्यू पावला, त्यावेळेस मुसल मानाचे धार्मिक अशौचविधी त्यानें मनापासून पाळले होते; ह्मणजे मुसलमान राज्यकत्यांशी फटकून वागून नव्हें, तर त्या राज्यकर्त्यांना चिकटून राहण्यां- तच आपले कल्याण अधिक होईल, शहाजीची श्रद्धा होती. उलटपक्षों मुसल- मान राज्यकर्त्यांशी फटकून राहिल्यानेच आपलें, आपल्या समाजाचें, देशाचें, व धर्माचें कल्याण अधिक होईल, अशी शिवाजीची श्रद्धा होती. धर्मसेवेने