पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६७ )

भद्धा दृढमूल होऊन तिचा विकास होत जातो; आणि श्रद्धेची जोपासना धर्मसेवेनेच करावी लागते, ही जोपासना पतित महाराष्ट्रामध्ये त्याकाळी साधूसंत ईश्वरी प्रेरणेनें करूं लागले होते; आणि प्रत्यक्ष शहाजीच्या ठायींहि ही धार्मिक श्रद्धा वास करीत होती; परंतु ती परमावधीस अथवा पूर्णत्वास पाँचलेली नव्हती; ह्मणजे ह्या धार्मिक श्रद्धेच्या जोरावर कल्पनातीत हाल, आपत्ती व कष्टसायास सोसण्यास व येणारीं संकटें शांतपणें स्रोशीत राहण्यास, राष्ट्रांतील कर्तेपुरुष व लढवय्या बहुजन समाज पुढे सरसावेल अशी मनाची खात्री पटण्याइतकी शहाजीची स्वतःची श्रद्धा जाज्वल्य नव्हती; इतकेच नाहींतर, जरी महाराष्ट्रांत ही श्रद्धा आस्ते- आस्ते सारखी पसरत चालली होती तरीसुद्धां, शिवाजीनें स्वराज्यसंस्थापनेचा उद्योग प्रत्यक्ष शेवटास नेईपर्यंत महाराष्ट्राचा स्वतःचाच विश्वास खुद्द स्वतःच्याच श्रद्धेवर बसलेला नव्हता. तथापि भावो काळांत ही स्थिति साफ- पालटली. शिवाजीनें स्वराज्य संस्थापनेचें कार्य सिद्धीस नेल्यानंतर महाराष्ट्राचा श्रद्धेवरील विश्वास अढळ झाला; आणि शिवाजीचा मृत्यु व संभाजीचा वध, यानंतरच्या काळांत मोंगल बादशाहा औरंगझेब याच्यार्शी, जे स्वातंत्र्याचें युद्ध महाराष्ट्रास इ० सन १६०७ पासूत सतत अठरा वर्षे एकसारखें करावें लागलें, त्या सर्व अवर्धीत, साधुसंतांनों उत्पन्न केलेल्या श्रद्धेवर, आणि राष्ट्री- तील कर्तेपुरुष व लढवय्या बहुजनसमाज, यांनी जोपासना करून वाढीस लाविलेल्या श्रद्धेवरील अढळ विश्वासाच्या जोरावर एकतानतेने झगडत राह- ण्याचा प्रसंग प्राप्त झाल्यामुळे, श्रद्धा व श्रद्धेवरील अढळ विश्वास यांचे पुण्य- म्हणजे साधुसंत, कर्ते पुरुष, व लढवय्या बहुजनसमाज यांचे पुण्य-मूर्तिमंत राष्ट्रापुढे उभे राहून ह्या भयंकर आपात्तीतून राष्ट्र बचावून यशस्वीपणे बाहेर आलें. आत्मयज्ञ हा केव्हांही श्रद्धेशिवाय शक्यच नाहीं; आणि बहुजन समा जाच्या आत्मयशाशिवाय केवळ हातांबोटांवर मोजतां येणाच्या थोड्याशा कर्त्या व्यक्तींच्या आत्मयज्ञानें-राष्ट्रास वळण दिले गेले, धडा मिळाला गेला, तरी सुद्धो- राष्ट्राचे संवर्धन व संगोपन होणे शक्य नाहीं. भद्धेमध्ये शक्ती उत्पन्न करण्याची संजीवनी असल्यामुळे श्रद्धेच्या वाढीबरोबरच राष्ट्राच्या शक्तीचीही वाढ झाली आणि शिवाजीच्या काळांतच श्रद्धेतील शक्ती जनतेच्या प्रत्ययास