पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६९ )

नव्हता; मराठा मंडळाकडून आपल्या राज्याचें संरक्षण व संवर्धन होतें, म्हणून तो समाज त्यांनी कामापुरता जवळ केलेला होता; फोड-झोड पद्धति अंगिकारिली होती; आणि इनामें, व तनें, जहागिरी, शिलेदारी, मनसबदारी, सरदारी, वगैरे प्रकारच्या राजाश्रयानें त्या समाजाचें पोट मुसलमानी राज्य- कर्त्यांच्या हातांत गेलेले होतें. म्हणजे मराठा समाज राजनिष्ठ राहिल्यास राजाश्रयाची वृद्धि करावी, व अराजनिष्ठ होऊं म्हणाल्यास त्याच्या पोटाला सहज चिमटा घेतां यावा, असे नियंत्रण त्या राज्यकर्त्यांनी आपल्या हाती ठेविले होते. त्याचा परिणाम असा झाला कीं, मुसलमान राज्यकर्त्याविरुद्ध राजकीय चळवळ करण्याचे एखाद्या मराठा सरदाराच्या मनांत आले तरी सुद्धां वृत्तिच्छेदाची भांति पुढे उभी राहिल्याबरोबर त्याचे विचार जागच्या जाग जिरून जात असत; व राजनिष्ठ राहणेच त्यांना भाग पडत असे. ह्या भीतीमुळे मराठा सरदारमंडळी प्राप्त स्थितींतच समाधान मानून कालक्रमणा करीत होती; परंतु शहाजी हा या सरदार मंडळीच्या मानानें विशेषच कर्तब- गार, तेजस्वी व धडाडीचा पुरूष असल्यामुळे प्राप्त झालेल्या स्थितीत समा- धान मानून न राहतां आपल्या कर्तनगारीनें आपणांस, मुसलमान राज्य- कर्त्यांशी प्रसंगों झगडून सुद्धां, जें श्रेष्ठ पद मिळविणे शक्य होईल, तें आपण मिळविलेंच पाहिजे, या महत्वाकांक्षेनें त्यान आपल्या भावी उद्योगाची दिशा रेखाटलेली होती. मराठा मंडळांत त्या काळापर्यंत जाघव घराण्याकडे चालत आलेला अप्रपूजेचा मान आपणासच मिळाला पाहिजे, मुसलमान राज्य- कर्त्यांच्या दरबारांतील मराठा मंडळांत श्रेष्ठ पदाचें ऐश्वर्य आपणांसच प्राप्त झाले पाहिजे, या महत्वाकांक्षने जाधव घराण्याकडे चालत आलेला अग्र- पूजेचा मान त्या घराण्याकडून हिसकावून आपल्या हाती घेऊन तो आपणा- कडेसच कायम ठेवावा, श्रेष्ठपदाचें ऐश्वर्य आपणच भोगावें, यासाठी वेरूळकर भोंसल्यांनी मालोजी व शहाजी या उभयतांनी-अश्रांत परिश्रम घेतले; अथवा मराठा मंडळांतील अप्रपूजेचा मान आपणांसच मिळाला पाहिजे, या महत्वा- कांक्षेनें प्रेरित होऊन, स्वतःचे श्रेष्ठत्व व महत्व प्रस्थापित करण्याकरितां शहाजीनें भावी काळांत जे अर्थात परिश्रम घेतले, त्यामुळेच तो भप्रपूजेचा मान जाधव घराण्याकडून भोंसले घराण्याकडे गेला. शहाजीचे वर्चस्व परमा-