पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७०)


वधीस गेलें, व त्याबरोबरच जाघवांचे महत्व पूर्णपणे नष्ट झालें. स्वतःच्या कर्तबगारीवर अढळ विश्वास, व अंगीकृत कार्यावर पूर्ण नजर ठेवून, महाराष्ट्र राजकारणाची कांटेरी धुरा मोठ्या आनंदानें स्वशिरावर घेऊन शहाजीनें -मोठ्या नेटानें व उत्साहानें विविक्षित मर्यादेपर्यंत महाराष्ट्राची अमोल्य सेवा बजाविली. तत्कालीन राजकीय परिस्थितीची जाणीव करून घेऊन महाराष्ट्र देश हल्ली कोणत्या स्थितीत व त्या स्थितीला योग्य आहे, अर्से राष्ट्राचे कर्तव्य कोणतें आहे, हें आकलन करण्याची श्रेष्ठ बुद्धिमत्ता शिवाजीच्या खालोखाल शहाजीच्या ठायीं वसत होती. या बुद्धीच्या जोरावर त्यानें आपल्यापरीने आपली सर्व शक्ति एकव- टून राष्ट्रकार्य करण्यास मोठ्या उत्साहाने सुरवात केली. शिवाजीच्या श्रेष्ठ कार्यक्षमतेचा प्रश्न बाजूला ठेवून असें म्हणणेंच भाग आहे की, शहाजी हा शिवाजीप्रमाणेच कार्याची विचक्षणा करीत बसला नाहीं; कार्याचा कीस काढीत राहिल्याने कार्यहानी होते, कार्याची विचक्षणा केल्याने कार्यनाश होतो, उलटपक्षी पुढारी कार्यतप्तर आहे, आणि जनता त्या पुढाऱ्याच्या पावलावर पाऊल टाकण्यास मोठ्या उत्साहानें तयार आहे, अशी स्थिति असेल त्याच वेळी, म्हणजे पुढारी व सामान्य जनता यांची विचारसरणी एक होऊन च उभयतांच्याही कार्याची एक्यवाक्यता होऊन उभयतांही जेव्हां स्वार्थत्याग व आत्मयज्ञ करण्यास तयार होतात, त्याच वेळीं कार्यसिद्धी होते; निदान ती होण्याची तरी आशा वाटू लागते. शहाजीच्या काळांत कांहीं श्रमाणांत अशी मनोभूमी तयार झाली. कार्याचें स्वरूप व्यापक नव्हतें, आकुंचित होतें; पण महाराष्ट्राचा नवा संसार कसा मोडावा, ह्या विचाराचें बीज त्या कार्यात वसत होतें; स्यामुळे शहाजीनें सतत अभ्रांत परिश्रम घेऊन आपल्या शक्ति व विचारसरणींप्रमाणे महाराष्ट्राचा नवा संसार मांडण्याचा कसून प्रयत्न केला; व त्यांत त्याने कांही प्रमाणांत यशही मिळविलें. साधारण जनतेच्या संसारांत ज्याप्रमाणें अनेक अडचणीं व संकटें उद्भवतात, त्याचप्रमाणे राष्ट्राच्या संसारां- तही ती नेहमीच उत्पन्न होतात. त्या नियमाला अनुमूरून रा संसार मांडूं पाहणाऱ्या शहाजीवरही अनेक संकटें आली. तथापि शहाजीनें न डगमगतां त्याच्या ठार्थी वसत असलेल्या शिवाजीच्या खालोखालच्या म्हणजे दुय्यम