पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७३)

 तंजावरचें राज्य, हैं— जरी शहाजीचा मुलगा व्यंकोजी यानें स्थापन केले असले तरी – वस्तुतः कर्नाटकांतील हे मराठयांचें राज्य, शहाजीराजे यानेंच स्थापन केलेले असल्यामुळे, त्या राज्यासंबंधों त्रोटक हकीकत शहा- जीच्या चरित्रांत देणे आवश्यक असल्याने ती या ठिकाणीं, परिशिष्टरूपानें दिली आहे.

 या बाबतींत, कै० न्या० रानडेकृत " Rise of the Maratha Power या ग्रंथाच्या बाराव्या प्रकरणांत "दक्षिण हिंदुस्थानांतील मराठे" या सदराखालीं, जी प्रास्ताविक माहिती दिली आहे, ती खालीलप्रमाणे आहे.

 " हिंदुस्थानच्या दक्षिणेस तंजावर हें एक मराठा संस्थान असून तेथील राजघराणे हिंदुस्थानांतील इतर घराण्यापेक्षा फार पुरातन आहे; व सुमारें दोनशे वर्षेपर्यंत - इ. सन १६७५ ते इ. सन १८५५ पर्यंत त्या घरा- ण्याचा पश्चिम हिंदुस्थानांतील " मराठा साम्राज्या च्या संस्थापकांशी अगर्दी निकटचा संबंध होता. असे असूनहि ग्रांटडफ किंवा एतद्देशीय मराठी बखरकार, यांपैकी एकानेंहि या दक्षिणेकडील मराठा वसाहतीची विशेष हकीकत कोठेंच दिलेली आढळत नाहीं. या दूरच्या हतभागी संस्था- नाची चमत्कारिक हकीकत वाचली म्हणजे, मराठा साम्राज्याची शक्ति, मराठी संस्थानांचा संघ होऊन जी एकी झाली, त्यांतच आहे, असे जें आमचें मत आहे, त्यास विशेष बळकटी येते. आपले हित निराळें, आपली कर्तव्याची दिशा निराळी, अशा समजुतीनें जे या मराठा संघापासून अलग राहिले, त्यांचा, परकीय किंवा एतद्देशीय इतिहासकारांनीही, मराठयांच्या इतिहासांत कोठेंच उल्लेख केला नाहीं. अशा प्रकारें अलग राहण्याची ही प्रवृत्ति सृष्टिक्रमाविरुद्ध आहे. तिजपासून खेदकारक का होईना, पण बोध- घेण्याजोगा आहे. " कावेरी " नदीच्या तीरांवरील " तंजावर " ही. मराठ्यां- ची दूरची लष्करी वसाहत होती. या वसाहतीपासून तिकडे जो एक शाश्वत परिणाम घडून आला, त्याचें महत्त्व इ. सन १८८१ च्या खाने- सुमारीवरून चांगले लक्षांत येतें. या खानेसुमारीत मद्रास इलाख्यांत मराठे
१८