पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७७)

सत्तेचा दास झाल्यानंतर हिंदुस्थानांत जो धामधुमीचा काळ प्राप्त झाला त्याच चेळेस मूठभर-फार झाले तर एकलाख पर्यंत असतील- मराठ्यांनी मद्रास इलाख्यांत जहागिरी मिळविल्या, आणि नवीन राज्य स्थापन केलीं. इतकेंच नव्हे तर त्यांची इभ्रत अजून पूर्वीसारखोच कायम असून अद्यापि त्या इला- ख्यांतील लोकसंख्येमध्यें हेच लोक काय ते प्रमुख आहेत. परंतु कांहींही असले तरी त्यांच्या प्राबल्यास आतां ओहोटी लागली आहे, हे मात्र खास आहे; इतके आपणांस कबूल करणे भाग आहे. म्हणूनच मराठामंडळांतील संयुक्त राज्यकर्त्यापेक्षा, मराठे लोकांच्याच सद्दीच्या काळाचें वर्णन करण्याच्या बाण्यानें जो इतिहास लिहिला आहे, त्या इतिहासांत तंजावरच्या राज्याची हकीकत देणे अगत्याचें आहे. "

 तंजावर हे शहर मद्रास इलाख्यांत, एक जिल्ह्याचे ठिकाण असून, दक्षिण कर्नाटकांत त्याचा समावेश होतो. या जिल्ह्याच्या उत्तरेस त्रिचना- पल्ली व दक्षिण अर्काट ( कढलोर ) हे कोलेरून ( हा कावेरी नदीचा फांटा आहे. ) नदीच्या पलीकडे असून, दक्षिणेस मदुरा जिल्ह्यांतील शिवगंगा जमिनदारी व तोंडमन राजाचा मुलूख, पूर्वेस व अग्नेयीस बंगालचा उप- सागर, नैऋत्येस मदुरा जिल्हा व पश्चिमेस मदुरा व त्रिचनापल्ली जिल्हा, व पदुकोट संस्थान हीं असून, तंजावर हें कावेरी व कोलेरून या नद्यांच्या दुआबांत, त्रिचनापल्लोपासून ३७ व मद्रासपासून २१७ मैलांवर आहे. तंजावर प्रांत राजकीय, धार्मिक व वाङ्मयविषयक बाबतीत अतीशय सुधार लेला, व उच्चत्वास पावलेला, अशी त्याची ख्याती असून ती आजतागायत कायम आहे; व त्याच्या सृष्टिसौंदर्यामुळे त्यास " दक्षिणेतील नंदनवन " ( The Eden of the South ) अशी संज्ञा असून, कावेरी व कोलेरून या दोन नद्यांमधील हा प्रदेश * मोठा संपन्न व सुपीक म्हणून त्याची प्रसिद्धी आहे.


 * कावेरी नदी [लांबी ४७० मैल ] ही कुर्ग प्रांतांत, [ सयाद्री पर्वतात ] उगम पावून ती प्रथम पूर्व व नंतर दक्षिण दिशेनें म्हेसूर संस्थानांतून, पूर्व व पश्चिम किनाण्यांच्या मध्यभागी असलेल्या पर्वतावलींतून वाहात जाऊन