पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७८ )

 शहाजी राजा इ० सन १६६४ मध्ये मृत्यु पावल्यानंतर तंजावरची जहागीर त्याचा मुलगा व्यंकोजी याच्याकडेस आली. शहाजीच्या काळांत, व पुढें व्यंकोजीच्या कारकीर्दीतही बंगळूर हॅच त्या उभयतांच्या राहण्याचें मुख्य ठिकाण, व मुख्य ठाणे असून, मराठा सैन्याची छावणीद्दी त्याच ठिकाणी असे. व्यंकोजीच्या कारकीर्दीत तंजावर व त्रिचनापल्ली येथील राज्य- कर्त्यांमध्ये प्राणघातक युद्धकलह सुरू झाले, त्यांत तंजावरकर विजय राघव नाईक याचा पराभव होऊन, तो विजापूर दरबारच्या आश्रयास गेला; व आपणांस गादीवर बसविण्याविषयी त्यानें त्या दरबारची मदत मागितली. तेव्हां आदिलशाही दरबारानें " तुम्ही तंजावरकर विजयराघव नायकास पुन्हा तंजाबरच्या गादीवर स्थापन करावें;" असा व्यंकोजीस हुकूम दिला. तेव्हां व्यंकोजी हा आपणांबरोबर बारा हजार सैन्य घेऊन विजयराघव नायकासह तंजावर येथे गेला; व त्रिचनापल्लीकर नायकाचा पराभव करून, व त्यास तेथून हांकलून लावून, त्यानें विजयराघव नायकास, आदिल शाहाच्या हुकुमा- प्रमाणें तंजावरच्या राजगादीवर स्थापन केले.

 तथापि व्यकोजी तंजावर प्रांतांतून परत गेला, अर्से पाहतांच विजयराघव नायक व त्याचे भाऊबंद यांच्यामध्ये आपसांत पुन्हां गादीबद्दल तंटा सुरू झाला; व तेथील राजाचा मुख्य प्रधान व इतर दरबारी मुत्सद्दी यांनी त्रिमलवाडी येथे येऊन व्यंकोजी राजाची भेट घेटली; व त्यास विजय-


फिरून पूर्वाभिमुखी होऊन म्हैसूर संस्थानांतून बाहेर पडते, व मद्रास इला- ख्यांतून वहात जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. या नदीस मुखाजवळ अनेक फाटे फुटलेले आहेत. त्यांतील सर्वांत उत्तरेकडील फाठ्यास कोलेरून असें म्हणतात. कावेरी नदी, म्हैसूर संस्थानांतून, मद्रास इलाख्यांत जातांना त्रिचनापल्लीजवळ, तिचे कावेरी व कोलेरून असे दोन भाग होऊन ती तंजावर प्रांतांतून पुढे जाऊन बंगालच्या उपसागरास मिळाली आहे. त्रिचनापल्लो नजीक तंजावरच्या राजांनी प्राचीन काळी धरण बांधून मोठा कालवा तयार केला आहे, तो “ मेलूरचा कालवा " म्हणून प्रसिद्ध आहे, व या कालव्या- मुळे तंजावर प्रांतास विशेष सुपीकता प्राप्त झाली आहे.