पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८१ )

केली, त्यावेळी तिनेंच त्याचें समाधान केलें. रघुनाथपंत हणमंते यांस शरण जाऊन त्याच्या मार्फत शिवाजीचें समाधान करण्याची त्यास सल्ला दिली; व तिनें स्वतःही रघुनाथपंताची परोपरी विनवणी केली; व त्यानंतर रघुनाथ- पंतानें व्यंकोजी व शिवाजी या उभयतांमध्यें तह करून दिला.

 शिवाजी हा आपल्या या भावजयीची योग्यता पूर्णपणे जाणून होता. रघु- नाथपंताच्या लेखान्वयें, शिवाजीनें तहाची मान्यता दाखवून जो जबाब लिहिला, त्यांत सुद्धा त्यानें दिपाबाई संबंध मोठा आदरपूर्ण उल्लेख करून "आमची भाव- जय [ दिपाबाई ] शहाणी, पुढील होष्यमान [ भवितव्यसा जाणून [ व्यंको- जीस ] विचारावरी आणिलें; " अशी तिची प्रसंशा केली आहे; व मुलखाच्या वांटणीच्या व बंदोबस्ताच्या कलमांत दिपाबाई संबंधी मुद्दाम एक कलम घालून त्यांत पुढीलप्रमाणे स्पष्ट उल्लेख केला आहे तोः-

 कलम १५; " परगणे बेंगरूळ आम्ही सोडविले; त्यास आसपास ठाण हासकोटें, व सिलेकोटें; ऐसे तीन महाल, दोन लाख वराईचें उत्पन्न आज आहे. जमेवर आल्यास पांच लाखांपर्यंत उत्पन्नास येतील. त्यास आम्ही आपले तर्फेनें चि० सौभाग्यवती दिपाबाईस चोळी बांगडीस दिल्हे आहेत. त्यास याचा विभाग तुमचे वंशांनी ( म्हणजे मुलाच्या वंशानी ) करूं नये; मुलींनी परंपरा आपले खाजगी खर्चास ठेवावे. त्याची चौकशी तुम्ही ( व्यंकोजीनें ) राखीत जावी. सौभाग्यवती ( दिपाबाई ) देतील, त्यांनी खावेत."

 यावरून दिपाबाईबद्दल शिवाजीस किती आदर वाटत होता, हे निदर्श- नास येतें. व्यंकोजीस या दिपाबाईपासून तीन मुलगे झाले. त्यांची नांवें, शहाजी, सरफोजी व तुकोजी; व्यंकोजीची दुसरी बायको मोहित्यांची कन्या अण्णुबाई. तिला दोन मुली झाल्या. व्यंकोजीस ह्याशिवाय नऊ परिगृहीत स्त्रिया होत्या. त्यापैकीं कांहींच्या पोर्टी चंद्रभान, सूर्यभान, मित्रभान, कलेभान, कीर्तिमान, विजयभान, व उदयभान असे सात पुत्र जन्मले. व्यंकोजीराजाच्या ताब्यामध्ये तंजावरचा जो प्रांत होता, त्याचे पांच सुभे होते. त्यांची नांवें--[१] सुभा त्रिवेदी; [२] सुभा कुंभकोणम्; [३] सुभा मायावरम्; [४] सुभा मन्नारगुडी; व [५] सुभा पट्टकोटा आणि बलम-