पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८८ )

होत चालला. त्यामुळे तो कर्नाटक प्रांतावर केव्हां स्वारी करील याचा नियम नव्हता. म्हणजे सादतउल्लाखानाच्या ताब्यांतील कर्नाक प्रांत निजामाच्या तडाक्याच्या भीतीत; आणि तंजावरचें राज्य, सादतउल्लाखान, व चिनकिली- चखान (निजामउल्मुल्क ) या दोन बलिष्ठ शत्रूच्या तडाक्यांत अस्तित्वांत होते. तथापि सरफोजीच्या कारकीर्दीत त्याच्या दक्षपणामुळे, या उभयतांपैकी एकाही शत्रूकडून तंजावरच्या राज्यास उपसर्ग पोंचला नाही, हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे.

 सरफोजी राजे यांस प्रापंचिक बाबतीत फारसा सौख्यलाभ झाला असेल असे दिसत नाहीं. उलट त्याच्या मनास अस्वस्थता उत्पन्न करणाऱ्या कांहीं विपरीत गोष्टी घडून आल्या, असे निदर्शनास येतें. सरफोजी यांस लग्नांच्या तीन बायका होत्या. त्यापैकी पहिली घाटगे घराण्यांतील सुलक्षणाबाई ही


व दिल्लीहून आलेलें खरदार, अमानतखान, इब्राहीमखान अबदूलखान व कंत्र- जखान वगैरे मंडळी समरभूमीत ठार झाली. निजामउलमुल्क यानें कंब्रजखा- नाचे शीर कापून तें दिल्ली येथे बादशाहाकडे पाठवून त्यास "स्वामींच्या दैवयोगानें आम्ही हा बंडवाला मारिला;" असें कळविलें. नंतर निजाम उलूमुल्क हैद्राबाद येथें गेला (राजवाडे, खंड दुसरा, व शकावली पान ४९/५० पाहा). तेथें कंत्रजखानाचा मुलगा रख्वाजा आदब म्हणून होता, त्याच्याशी सल्ला करून, निजा- मानें गोवळकोंडा, व इतर किल्ले घेतले. अशा प्रकारें सर्व दक्षिण भाग निजामाच्या स्वाधीन झाला. फत्तेखेर्डा येथें निजामास मिळालेला हा विजय (ता. २ आक्टोबर, इ० सन १७२४.) दक्षिणच्या इतिहासांत क्रांतिकारक असून, एकंदरीत इ० सन १७२४ हें वर्ष निजामशाहीच्या स्वातंत्र्यस्थापनेचे होय असें म्हण ण्यास हरकत नाहीं. त्यानंतरच्या काळांत निजामाचे बहुतेक सर्व व्यवहार मरा- ठ्याशीं घडलेले आहेत; व त्याच भावी काळांत निजाम हा मराठ्यांचा एक जबरदस्त प्रतिस्पर्धी म्हणून दख्खनच्या राजकीय पटावर प्रमुखत्वानें पुढे आला आहे.

 फत्तेखेर्डा येथें, मोंगल सरदार बारीजखान हा युद्धांत मृत्यु पावला. त्याची कबर लढाईच्या मैदानांत असून त्यास इनाम जमीन आहे.