पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९२ )

( इ० सन १७३६ ) न त्यानंतर थोड्याच दिवसांनी तो भ्रमिष्ट होऊन मृत्यू पावला. त्यास पुत्रसंतती नसून फफ सुजानबाई या नांवाची एक स्त्री होती. ती शहाणी, चतुर, विशेष औदार्यशाली व सद्गुणी होती, त्यामुळे दरबारी मंडळींनी तिला गादीवर बसवून तिच्या नांवाची द्वाही फिरविली, ती मोठी हुषार असून दरबारी मंडळीवरही तिचे चांगलें वजन बसले; तथापि तीन वर्षांतच तिला शत्रू निर्माण होऊन तिच्यावर पदभ्रष्ट होण्याचा प्रसंग आला. ६०. सन १७३८ मध्ये, 'सबाई शहाजी' या नांवाचा कोणी इसम, कोयाजी घाटगे या नांवाच्या एका सरदाराच्या साह्यानें तंजावरच्या गादीचा इक सांगण्याकरितो तोतया निर्माण झाला; आणि त्यानें तंजावर येथील किल्ले- दार सध्यदखान यांस फितवून तंजावरची गादी. बळकाविली. तंजावरच्या इति- हासांत हा तोतया 'काट राजा' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने इंग्रज व फ्रेंच लोकांस द्रव्य देऊन त्यांचें सैन्य आपल्या मदतीस बोलाविलें; व तंजा- वरच्या गादीचे आपण अस्सल वारस आहों, असा सर्वांच्या मनांत भ्रम उत्पन्न केला; तथापि त्याचें ढोंग लवकरच बाहेर पडले. हा काट राजा ' रूपी या नांवाच्या एका बटकीचा मुलगा असून, त्याचा तंजावरच्या राजघराण्याशी व गादीशीं कोणस्याहि प्रकारे तिळमात्र संबंध नाही, अशी किल्लेदार सय्यद खान याची व मुख्य मुख्य सरदारांची खात्री झाली; त्यामुळे त्यांनों


यांच्यामध्ये कलह उत्पन्न झाला. ही संधी साधून अर्काटकर नबाव: दोस्त अल्लीखान यानें आपला मुलगा सफदरअल्लों, व जावई चंदासाहेब या उभय-. तांना त्यांचा तंटा मिटविण्याच्या मिषानें त्रिचनापल्ली येथे पाठविले. त्याप्रमाणे चंदासाहेबाने तेथे जाऊन मोठ्या युक्तीनें राणी मिनाक्षीअम्मा हिला अनुकूल करून घेतलें; व त्रिचलापल्लीचा किल्ला व फौज आपल्या ताब्यात घेऊन तिला दग्यानें बंदिवासांत टाकिलें, व त्याच ठिकाणी ती पुढे लवकरच काळा- घान झाली ! अशा प्रकारें इ० सन १७३६ मध्यें, तंजावरजवळील त्रिचना- पल्लांचे प्राचीन हिंदु संस्थान चंदासाहेबाच्या ताब्यात गेल्यामुळे त्याचें नांव दक्षिण हिंदुस्थामामध्ये विशेष प्रसिद्धीस भालें, आणि तिकडील राजकारणी मध्येहि त्याचे महत्व विशेषच वृद्धिंगत झाले.