पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

{{center|(२९३)}

या डोंगी काट राजास तात्काळ काट दिला, व तुकोजीचा दुसरा मुलगा सयाजी यांस गादीवर बसविलें; ( इ० सन १७३९). आणि श्यास नाममात्र राज्जा करून सर्व राज्यकारभार तंजावर येथील मुसलमान किल्लेदार सध्यदखान व त्याचा भाऊ सय्यद कासम यांनी आपल्या हातीं घेतला व लवकरच सध्यदखानानें त्यास पदभ्रष्ट करून सिधोजी या नांवाचा एक दुसराच इसम गादीवर बसविला. तेव्हां सयाजी हा तंजावर येथून पळून पांडेचरी नजीक चिदंबरं येथे गेला व तेथून त्यानें फ्रेंचांची मदत मागितली आणि आपणांस तंजावरच्या गादीवर पुन्हां स्थानापन केल्यास, आपण पूर्व किना-यावरील कारीकल बंदर, त्याच्या नजीक असलेला कर. कनगढी नांवाचा मजबूत किल्ला व कांही गावें तुम्हास देऊं" असे त्यानें फ्रेंथाना कबूल केले. फ्रेंच सरदार डुमास यानें हैं सयाजीचें म्हणणें मान्य करून फ्रेंच सैन्य व दोन जहाजे कारीकल बंदर ताब्यात घेण्यास पाठविलीं. व याच फ्रेंच सैन्यानें तसेंच पुढे जाऊन सयाजीस तंजावरच्या गादीवर बस- यावें, असा त्यास हुकूम दिला. इतक्यांत इकडे सध्यदखानाशींही सयाजीनें संधान बांधिलें होतें तें यशस्वी होऊन सय्यद खान त्यास वश झाला; व त्याच्या मदतीनें तो पुन्हां तंजावरच्या राज्याचा अधिपति झाला. फ्रेंच्यांना कारीकल बंदर देण्याचे त्यानें साफ नाकारिले, त्यामुळे हातचा डाव गेलेला पाहून डुमास यास वाईट वाटलें. तथापि सयाजीशी उघडपणे युद्ध करण्याचें स्यास घाडस झाले नाहीं; पण इकडे चंदासाहेबास फ्रेंचास खूष करण्याची ही आयतीच संधी मिळाली. त्याने आपण होऊन कारीकल जिंकून फ्रेंचांचे ताब्यात देण्यासाठी कारीकलवर आपले सैन्य रवाना केले. तेव्हां सयाजीनेंहि कारीकलच्या बचावासाठी आपली फौज तिकडे रवाना केली. तिकडून फ्रेंच- चीहि फोज चालून आली व तिने चंदासाहेबाच्या मदतीनें कारीकल जिंकलें. तेव्हां सयाजीचा नाइलाज होऊन तो आपल्या कराराप्रमाणे वागण्यास तयार झाला. पण इतक्यांतच तो पदभ्रष्ट होऊन तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह हा गादीवर आला व त्यानें सयाजीनें फ्रेंचाबरोबर चिदंबरं येथे केलेला करार पार पाडला. अशा रीतीने कारांकल, करकनगढी व कांहीं गांवें मिळून सुमारें ३०-४० हजार रुपये उत्पन्नाचा तंजाबरच्या राज्यांतील पूर्व किना-यावरील