पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९९ )

ण्याचा प्रयत्न केला; आणि इकडे मराठथांनींहीं उफ्तरअल्लीखान व त्याचा दिवाण मीर आसद यांच्या सल्लयानें, योग्य संधी साधून त्रिचनापल्लीवर हल्ला करून ते शहर इस्तगत करून घेण्याचा निश्चय केला. इतक्यांत " पेशवा बाजीराव हा नर्मदा नदीजवळ रावेर ऊर्फ रावेरखेडी x येथें मृत्यु पावला, [१]] अशी बातमी, मराठयांचा या मोहिमेतील मुख्य सरदार सेनासाहेब रघूजी भोसले यांस समजली. रघूजी हा बाजीरावाचा प्रतिस्पर्धी होता. बाबूजी नाईक बारामतीकराचा एक प्रबळ साह्यकारी दोस्त होता; व त्यालाच छत्रपति शाहूकडून पेशवाईची वस्त्रे देववावी, असा रघूजीचा मानस होता. म्हणून तो शिवगंगा येथे मराठ्यांच्या सैन्याचा तळ ठेवून महाराष्ट्रांत सातारा येथे परत आला, व बाबूजी नाईकास पेशवाई पदावर स्थानापन्न करण्याकरितां त्याने आपली शिकस्त केली. परंतु त्यांत त्यास यश न मिळतो शाहूनें बाजीरावाचा मुलगा बाळाजी नानासाहेब-बाजी- राव मृत्यू पावला, त्यावेळी त्याच्याजवळ त्याचें कुटुंब काशीबाई व घाकटा मुलगा जनार्दनपंत हे असून बाळाजी कुलाबा येथे होता; तेथेंच त्यास बाजी. रावाच्या मृत्यूची बातमी समजल्यावर उत्तरक्रिया आटपून तो आपला काका


 x बाजीराव हा उत्तर हिंदुस्थानांतून परत येत असतां आपल्या नवीन जहागिरीत रावेर येथें ता० २५ एप्रील इ० सन १७४० रोजी, थोडे दिवस आजारी पडून एकाएकी मृत्यु पावला.

 रावेर उर्फ रावेरखेडी हा गांव होळकराच्या ताब्यांतील नेमाड ऊर्फ खरगोण जिल्ह्यांत, सनावद रेलवे स्टेशनजवळ, नर्मदा नदीपासून तीन मैलांवर असून तेथे बाजीरावाची छत्री आहे. या छत्रीस कसरावद, कानपूर आणि बेडिया या तीन परगण्यांचे उत्पन्न लावून दिलेलें होतें; तें पेशवाई बुडेपर्यंत चालू होते. परंतु पुढें पेशवाई बुडाली तेव्हां छत्रीच्या खर्चासाठी तोडून दिलेला प्रदेश इंग्रजांच्या ताब्यांत गेला, व छत्तीचे हे उत्पन्न बंद झाले. रावेर हा अगदीच लहान गांव असून तेथें एक घर्मशाळा, व देशी दवाखाना आहे. बाजीरावाच्या छत्रीस होळकर दरबाराकडून दरसाल १२५ रुपयांची नेमणूक आहे.