पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ३०२ )

अनवरुद्दिनखान हा कर्नाटकच नबाब बनून तेथील राज्यकारभार चालवू लागला.

 नबाब अनवरुद्दीनखान हा कर्नाटकच्या नवाबीगरीवर स्थानापन्न झाला न झाला तोच त्यानें तिकडे आपली सत्ता वृद्धिंगत करण्यास सुरवात केली. कर्नाटकमधील हिंदुराजे, संस्थानिक व पाळेगार, यांना आपल्या श्रेष्ठ संत्तखाली आणण्याचा त्याने प्रयत्न आरंभिला, आणि तंजावरकर प्रतापसिंहकडे पेषकश अथवा खंडणी मागण्यास त्यानें सुरवात केली. परंतु प्रतापसिंह हा मोठा स्वाभिमानी राज्यकर्ता असून तो कर्नाटकच्या नबाबचा मांडलीक होण्यास अथवा त्यास खंडणी देण्यास तयार नव्हता, प्रतापसिंह हा आपणांस खंडणी देत नाहीं, अर्से पाहून अनवरुद्दीनखान यानें त्यास “ खंडणी द्या, अथवा युद्धास तयार व्हा " असा निर्वाणांचा निरोप पाठविला. त्यावर प्रतापसिंहानें, खंडणी देण्याचें अमान्य करून, त्यास युद्धास पाचारण केलें. तेव्हां अनव-


एका पक्षानें मुरारराव घोरपडे व इंग्रज यांची मदतथेऊन मूर्तुजाअल्लीस पदभ्रष्ट केलें. आणि सफ्तर अल्लो याचा अल्पवयी मुलगा सय्यद महंमदखान याची नबाबी पदावर (इ. सन १७४२) स्थापना केली.

 अनवरुद्दीन हा निजाम उलूमुल्क याच्या पदरी एक सरदार असून त्याचा बाप औरंगजेबाजवळ कुराण पढविण्याचे काम करीत असे. त्याच्याच नशि- त्याने अनवरुद्दीनखान यांस प्रथम पांचशेंची मनसब मिळाली. पुढे तो निजाम उलूमुल्काच्या वढिलाजवळ गुजराथेंत होता. तेथून निजामापाशी येऊन त्यानें त्याच्या हातांखाली अनेक ठिकाणी कारभार केला. निजामानें कर्नाटकवर स्वारी केली, तेव्हां त्यास गोवळकोंड्याच्या बंदोबस्तास ठेविला होता; व पुढे कर्ना- टकाचा बंदोबस्त ठेवण्यास हाच योग्य आहे, व हा आपल्या भरंवशाचा, शूर व अनुभवी आहे, असें जाणून निजामानें त्यास, सफ्तरअल्ली याचा अज्ञान मुलगा सय्यद महंमदखान याच्या तर्फे अर्काटच्या नवाबगिरीवर नेमिलें, व पुढे लवकरच एका लग्नप्रसंगीत, सय्यद महंमदखान याचा खून झाल्यानंतर, निजाम उल्मुल्क यानें, अनवरुद्दोन यांस कर्नाटकच्या नबाबगिरीवर कायम केलें.