पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३०३ )

रुद्दीनखानानें आपला मुलगा माफूजखान यांस, त्याच्याबरोबर सैन्य- सामुग्री देऊन, तंजावरावर पाठविले. त्याप्रमाणे तो लागलीच तंजावरावर चाल करून आला. इकडे प्रतापसिंह यानेंही युद्धाची सिद्धता करून ठेविली होतीच. त्यामुळे तोही स्वसैन्यासह माफूजखानार्शी युद्ध करण्यास पुढे आला; व या उभय सैन्यामध्यें, तंजावरच्या किल्ल्याच्या उत्तरेस एक कोसावर, मोठेंच हातघाईचे युद्ध झाले [ इ० सन १७४४ जून ]. त्यांत प्रतापसिंह विजयी झाला, व पराभूत झालेला माजूफखान त्रिचनापल्ली येथे परत गेला. या पराजयाची वार्ता अनवरुद्दीन यांस समजतांच त्याने आपल्या सैन्याची पुन्हां मोठीच जारीची तयारी केली. कालाइस्ती* व व्यंकटगिरी+ येथील


 * कालाहस्ती ( Kalahasti ) हे जमिनदारी गांव उत्तर अर्कोट जिल्ह्यांत असून येथील जमिनदारी गांवें उत्तर अर्काट व नेल्लोर जिल्ह्यात पसरलेली आहेत. कालाहस्ती ही कर्नाटक प्रांतांतील सर्वांत मोठ्या जमिनदारी इस्टेटी- पैकी एक असून, या जमिनदारांची, उत्तर अर्काट जिल्ह्यामध्ये ६१२ व नेल्लोर जिल्ह्यामध्ये १९• गांवें, मिळून एकंदर ८०२ गावें आहेत; व तिचें क्षेत्रफळ उत्तर अर्कोट जिल्ह्यामध्ये ७३६ मैल व नेल्लोर जिल्ह्यामध्यें, ४१५ मैल, मिळून एकंदर ११५१ मैल आहे. ही जमिनदारी इंग्रज सरकारास दोन लाख रुपये खंडणी (Peshkash पेषकश ) देत असते. कालाइस्ती है तेथील जमिनदाराचें राहण्याचे मुख्य ठिकाण, व जमीनदारीचें मुख्य ठाणें असून, तें सुवर्णमुखी नदीच्या पूर्वकिनाण्याबर, तिरुपाटी स्टेशनपासून बावीस मैलांवर आहे. व कालाइस्ती हें रेल्वे स्टेशन असून तें गांवापासून अजमायें एक मैलावर आहे. येथे शंकरपार्वतीचें एक प्रसिद्ध व भव्य देवालय असून शिवरात्रीस तेथें मोठी यात्रा भरते, व दहा दिवस मोठाच उत्सव होतो. व या देवालयामुळेच कर्नाटकांत, या गांवाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कालाइस्ती व व्यंकटगिरी यामध्ये १५ मैलांचे अंतर आहे.

 + व्यंकटगिरी, दीदी कालाहस्तीप्रमाणेच एक मोठी जमीनदारी असून सी उत्तर अर्काट जिल्ह्यांत, कालाहस्तीपासून १५ मैलांवर आहे, व तें एक रेल्वे स्टेशनही आहे. येथे ब्रह्मदेवाचें एक देवालय असून तेथे दरवर्षी जून अथवा जुलई महिन्यांत मोठा उत्सव होत असतो.