पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०४ )

जमीनदारांस आपल्या पक्षांत ओढून घेऊन त्यांचे सैन्य भदतीस बोलावून घेतले, आणि मोठ्या भारी सैन्यासह त्याने स्वतः इ० सन १७४५ मध्यें पुन्हां तंजावरावर स्वारी केली. तेव्हां तंजावरच्या सैन्याचे अधिपती गोविंदराव शेडगे, व मानाजीराव जगताप हे तीन हजार निवडक स्वार व कांहीं तोफा आपणाबरोबर घेऊन नबाबाच्या सैन्याबरोबर सामना देण्यास पुढे आले; व तंजावरच्या ईशान्येस तीन कोसावर, पशुपति गुडी, म्हणून एक गांव आहे, तेथे उभयतां सैन्यामध्ये मोठेंच, निकराचें युद्ध झाले. त्यांत उभय पक्षांचे अतिशय नुकसान झाले. तथापि या युद्धामध्ये तंजावरच्या राजास यश आले, किंवा अनव रुद्दीनखानास यश आले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि प्रतापसिंहानें, अनवरुद्दीनखानास सात लक्ष रुपये खंडणी देण्याबद्दल, त्या वेळी एक दस्तऐवज लिहून दिला, व कांहीं रोकड रकमही दिली, असे इंग्रजी कागदपत्रावरून दिसून येतें.


 या बाबतीत "श्रीमत् भोसले- वंश-चरित्र" या शिलालेखांत व खुद अनवरुद्दीनखानाच्या लेखात, अगदीच परस्परविरुद्ध अशी हकीकत दिली आहे; ती अशी की

 “श्रीमत् भोसले वंश चरित्र" या शिलालेखांत या युद्धाचें असे वर्णन केले. आहे की, "उभय सेनाही जमून प्रातःकाल समयी युद्ध जाहल्यांत, तंजावरची फौज समग्र आंत शिरून त्यांच्या तोफखान्यासही मागे टाकून, अनवरुद्दीन- खानाची फौज तमाम ढवळून जाऊन, तंजावरचे फोजेकडून बहुत फौज मारली गेली; बहुतजण नामांकित देखीळ, पुढे टिकवेनासे होऊन, पळून गेले. शेवटीं तंजावरचे फौजेच्या लोकांनी अनवरुद्दीन खानाचा खास स्वारीचा हत्ती, माल्यावर्ची- च्या मारानें खिळून उभा करून, उच्या टाकून, हत्तीवरी चढून अंबारीच्या काहा- डण्या कापूं लागले. तेव्हां अनवरुद्दीन खान सांपडला जाऊन, चार घटकापावेतों आपल्या तोंडानें तंजावरचें फौजेचे लोकांस दुराई देऊन राइतें केलें. इतक्यांत किल्लसमीप जाइला करितां महाराजास है वर्तमान कळून, महाराजांनी बाद- शाही सुमदार ( म्हणून ) अनवरुद्दीनखानास सोडून येणे, म्हणून निरोफ