पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )

जिह्यांत भांबोरी येथे, व नागोजीच्या वंशापैकी काकाजी ऊर्फ रावजी यांचे वंशज वावी येथे आजतागायत आस्तित्वांत असून आपआपल्या वतनांचा उप- भोग घेत आहेत.

 वर लिहिल्याप्रमाणे, विठोजीस आठ पुत्र झाले, परंतु मालोजीस मूल होत नव्हतें; त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी त्यानें व त्याची पत्नी दिपाबाई हिनें


माघारें मुख लोकांस काय दाखवावें १ म्हणोन हातांत भाले घेऊन, फिरंगा मांडी खालीं ठेवून, नीट इत्ती सम्मुख होऊन, गंडस्थळे लक्षून मारिते झाले; तो श्रीशंभूच्या प्रतापें करून हत्ती गर्जना करून माघारे फिरते झाले. सर्वेच सैन्यही संपूर्ण मागून येते झालें. परमघोर युद्ध परस्परें होतें झालें. त्या युद्धांत हे उभयतां बंधू हातांत फिरंगा घेऊन, जैसे कांहीं ईश्वराचें सुदर्शन फिरतें, स्या न्यायें करून फिरते झाले. त्या यवनांचा ( आदिलशाही सैन्याचा ) पराभव करून सात शत अश्व सोडवून आणिले; आणि कित्येक योद्धे संहार करून, आपल्या सैन्यासह वर्तमान डंका वाजवीत, यशस्वी होऊन, शिबिरास येऊन, उतरते झाले. मग समस्त शूर सैन्यांत होते त्यांस दोघे अवगमले जे (त्या वेळीं निबाळकरांच्या सैन्यांतील सर्व शूर योद्धयांना या उभयतां बंधूविषयीं असे वाटले कीं, ) हे परमयोद्धे, झुंझार, सामर्थ्यवंत, प्रतापी, धन्य यांचीं माता- पितरें, ज्यांच्या उदरीं ऐसी रत्ने निर्माण झाली. ऐसी स्तुती परस्परें करों लागले; ते कोर्ति चहूंकडे प्रगट झाली. "

 अशा प्रकारें, मालोजी व विठोजी या उभयतां बंधूंनी या कोल्हापूरच्या स्वारींत अलौकिक पराक्रम गाजविल्यामुळे, त्यांचा व जगपाळरावाचा विशेष स्नेह जुळला; व त्यांचा लौकिक अहमदनगर येथील निजामशाही दरबारच्या कानावर जाऊन, जगपाळरावाच्या खटपटीनें, त्यांची जप्त असलेली वतनें निजामशाहानें मोकळी करून त्यांना परत दिलीं; त्यांचा योग्य आदरसत्कार करून त्यांना “ राजे " हा किताब दिला. ( इ. सन १६०४) आणि हे उभयतां बंधू या वेळेपासूनच निजामशाही नौकरींत दाखल झाले.

 अशा रीतीनें भाग्योदय झाल्यावर जगपाळराव यानें आपली बहीण दिपा- बाई ही मालोजोस दिली, हीच साध्वी दिपाबाई ही राजे शहाजी याची आई व छत्रपति शिवाजी याची आजी होय.