पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ३०९ )


युद्धे करीत व सैन्य जमवीत कर्नाटक प्रांतांत आला; फ्रेंच सरदार ढुले यांस भेटला, त्याच्यार्शी एक तह केला; त्याची मदत मिळविला; निजामउलूमुल्क याचा नातू हितायत् मोहिद्दोनखान यांस " मुजफरजंग " असा किताब देऊन त्याच्या नांवानें “ दक्षिणचा सुभेदार " अशी द्वाही फिरविली; आणि फ्रेंच व मुजफरजंग याचें सैन्य, व आपण जमविलेले मोठे सैन्य, योसह अर्काटचा नबाब अनवरुद्दोनखान याच्यावर चाल केलो. अंबूर + येथें उभय सैन्यामध्ये मोठे निकराचे युद्ध होऊन त्यांत अनवरुद्दीन मारला गेला. ( ता० ३ आगष्ट इ० सन १७४९ ) त्याचा एक मुलगा, माफूजखान हा चंदासाहेबाच्या हाती सांपडला. दुसरा मुलगा अहंमदअल्ली हा त्रिचनापल्ली येथे पळून गेला. या विजयशप्तांनंतर तो “ अर्काटचा नबाब " बनला, व तुम्ही एकदम जाऊन त्रिचनापल्लो काबीज करा. " असा डुप्ले यानें त्यास आग्रह केल्यामुळे, तो फ्रेंच सैन्य, व आपले व मुजफरजंगाचें सैन्य बरोबर घेऊन तो तिकडे जाण्यास निघाला. त्यावेळी या सैन्याच्या खर्चास डुले यानें स्वतःच्या पदरचे एक लाख रुपये कर्ज दिले व इतर मंडळीकडून दोन लाख देवविले. परंतु चंदासाहेबाच्या हाती पडलेले हे तीन लाख रुपये त्यानें व मुफजरजंगानें मिळून भलतीकडेसच खर्च केले, आणि अर्ध्या रस्त्यावर आल्या- चर पैसा नाही, म्हणून त्रिचनापल्लीवर जाण्याचा आपला बेत सोडून देऊन तो तंजावरकडे वळला, व तेथील राजा प्रतापसिंह याच्यापासून उकळ- ण्याचा त्याने निश्चय केला.

 चंदासाहेब हा तंजावर येथे आल्याबरोबर त्याने लागलीच " आमच्या सैन्याच्या खर्चाकरितां पैसे पाठवा " म्हणून प्रतापसिंहास कळविले. अनवरु-


 + अंबूर ( अंबूरदुर्ग अथवा पेटांबूर ) हैं गांव उत्तर अर्काट जिल्ह्यांत रेलवे स्टेशन असून ते वेल्लोरपासून २८ मैलांवर, बडामहाल या डोंगराच्या पूर्वेकडील फांठ्यांतील कडापानाथम् या घाटाच्या पायथ्याशी पालार नदीच्या दक्षिण किनाश्यावर आहे. येथील किल्ला मोठा अवघड व बळकट असून तो कर्नाटकमधील कडापानाथम् या घाटाच्या नाक्याचा व माझ्याचा असल्यामुळे पूर्वकाळ तो विशेष महत्त्वाचा गणला गेला होता.