पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१० )

द्दीन खानाबरोबरील युद्धामध्यें विजयी होऊन " कर्नाटकचा नबाब बनल्या बरोबर, " मी तंजावरच्या राजास बिलकुल त्रास देणार नाहीं. " हा प्रति- बंधांतून मुक्त होतांना मराठ्याबरोबर केलेला करार साफ विसरून जाऊन प्रतापसिंहानें खुषं नें पैसे न दिल्यास सक्तीने ते वसूल करण्याचा चंदासाहे. बाने मनसुबा केला, व पैसे ताबडतोब पाठवा अशी प्रतापसिंहाकडे निकड लाविली. प्रतापसिंहाने निरनिराळ्या सबबी काढून, त्यास पैसे देण्याची टाळा- टाळ सुरू केली. "अर्काटचा माजी नबाब अनवरुद्दीनखान याचा मुलगा महंमद अल्लीखान हाच अर्काटच्या गादीचा खरा वारस असून तो माझा स्नेही आहे, त्यामुळे त्याच्या शत्रूस मी कोणत्याही प्रकारे मदत करूं इच्छीत नाहीं. " असे चंदासाइबे यांस कळविले. इंग्रज, नासीरजंग व महंमद अल्लांखान यांच्याकडे निरोपावर निरोप पाठवून मदत मागितली; इंग्रजांनी महंमद अल्लोखान यांस थोडीशी मदत पाठविली होती, त्यांतील वीस लोक त्यांनी तंजावर येथे रवाना केले. इकडे, त्रिचनापल्ली हस्तगत करून घेण्याचें काम चंदासाहेबानें दिरंगाईवर टाकले, हे पाहून डले याच्या अंगाचा तिळ- पापड झाला. तंजावरच्या नादी लागून चंदासाहेब सर्वच घालवितो की काय अशी भांति व शंका त्यास उत्पन्न झाली. त्यानें, चंदासाहेबाबरोबर असलेल्या सैन्याचा सरदार ड्यूकिन यांस " तुम्ही ताबडतोब तंजावरकराला जरबाची तंबी देऊन, पैसा वसूल करावा; व लागलीच त्रिचनापल्लांवर चाल करून निघून जावें; " असा हुकूम पाठविला. त्याप्रमाणें डधूकिन यानें ताबडतोब तंजावरच्या किल्ल्यावर हल्ला करून तो काबीज केला. त्याबरोबर प्रतापसिंह जेरीस येऊन चंदासाहेबास सत्तर लाख रुपये, आणि फ्रेंच सैन्यास दोन लाख रूपये इनाम व फ्रेंच सरकारास ८१ गाँव देण्यास तो कबूल झाला. परंतु हे पैसे देण्यासही तो दिवसगत लावू लागला. तेव्हा चंदासाहेबानें प्रताप- सिंहाकडू छपन लक्ष रुपयांचा कागद लिहून घेतला ( हा कागद चंदासाहे- बाने फ्रेंचांच्या हवाली केला. व याच दस्तऐवजाच्या आधाराने पुढे इ० सन १७५८ मध्ये, हे छपन्न लाख रुपये वसूल करण्याकरतां फ्रेंच सरदार काउंट लाली यानें तंजावर प्रांतावर स्वारी केली ) व बाकीच्या रकमेबद्दल सोने नाणे व जडजवाहीर देण्याचे बोलणें लाविलें, इतक्यांत नासीरजंग मोठ्या सैन्यानिश