पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३११ )

तंजावरच्या कुमकेस आल्याची बातमी आली, तेव्हा चंदासाहेब पांडेचरी येथे पळून गेला (इ० सन १७५९) याप्रमाणे तंजावरवरील हें अरिष्ट कांही काळ तरी दूर झालें.

 त्यानंतर नासीरजंग, महंमदआल्लो, व इंग्रज हा एक पक्ष आणि मुज्फरजंग, चंदासाहेब व फ्रेच हा एक पक्ष, असे दोन पक्ष उघडपणे पुढे येऊन कर्नाटकमधील दुसरें युद्ध सुरू झाले. त्यांत तंजावरकर प्रतापसिंहाने पहिला पक्ष स्वीकारून, आपला सेनापति मानाजीराव ( माणकोजी ऊर्फ माणकजी ) यांस, त्याच्या बरोबर तीन हजार स्वार, व दोन हजार पायदळ अर्से निवडक सैन्य देऊन महंमद अल्लांच्या मदतीस पाठविलें, व या तंजावरच्या शूर सेनापतीनें व सैन्यानें, अनेक ठिकाणी चंदासाहेब व फ्रेंच यांच्याशी निकराचे सामने नेऊन त्यांना अगदी जेरीस आणून मोठेच नांव गाजविलें. फ्रेव सरदार लॉ व चंदासाहेब है कावेरी नदीतील श्रीरंगम् या बेटांत तळ देऊन राहिले होते. तेथे ते उभ यताही शत्रूकडून कोंडले गेल्यामुळे त्यांचा नाइलाज होऊन ते शत्रूच्या स्वाधीन झाले. यावेळी इंग्रज व फ्रेंचांचे युद्ध सुरू नसल्यामुळे, फ्रेंचांना कैद करून ठेवणे इंग्रजांस शक्य नव्हते. पण चंदासाहेबांवर मात्र कठीण प्रसंग गुजरला. त्याचा पूर्ण नाश होण्याची वेळ आली. महंमदअल्लांच्या हातांत सांपडला तर त्याला मृत्यूशिवाय दुसरी गतिच नाहीं, असा दुर्धर प्रसंग प्राप्त झाला. तेव्हां चंदासाहेबाचा बचाव करण्याची फ्रेंच सरदार लॉ यांस अतिशय विवंचना लागली. त्यानें तंजावरकर प्रतापसिंहाचा सेनापति मानाजीराव यांस पैसे भरून चंदासाहेबास बाहेर काढून सुरक्षितपर्णे पोंचवावें, असा बेत ठरविला व त्याप्रमाणे व्यवस्था केली. मानाजीरावानें ठरलेली रक्कम घेतली. जीव बचावण्याची शपथ घेतली. तेव्हां चंदासाहेब पालखीत बसून माणकोजीच्या छावणीत आला व त्यास लागलीच बेड्या ठोकून कैदी करण्यांत आले. दुसऱ्या दिवशीं इंग्रज सेनापति मेजर लॉरेन्ससह चार प्रमुख मंडळी एकत्र जमली, व " चंदासाहेबांचे पुढे काय करावयाचें १" याविषयी वाटाघाट झाली. मेजर लॉरेन्स त्यास आपल्या ताब्यांत घेण्यास तयार झाला, पण दुसऱ्या दिवशी त्यानें कानावर हात ठेवून आपले अंग या प्रकरणांतून काढून घेतलें, तेव्हा त्याच दिवश