पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१९ )

“या धरणावर आपलेंच स्वामित्व आहे." असा हक सांगून, स्यानें तंजाव- वरच्या राजास त्याची दुरस्ती करूं दिली नाही. त्यामुळे वादाचें कारण उत्पन्न होऊन परस्परांमध्यें हर्शामर्श सुरू झाला, आणि नबाबानें हा कालवा बंद करून तंजावर संस्थानाच्या सुपीकतेच्या मुख्य साधनावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हां तुळाजीने घाबरून मद्रासकर इंग्रजांची मदत मागितली. मद्रास- करांनी मि. जेम्स बोशियर या नांवाचा आपला एक कोन्सिलर चौकशीसाठी तिकडे पाठविला व त्याने योग्य चौकशी करून "हें घरण तंजावरच्या राजाच्याच मालकीचें आहे." असा मद्रास सरकारास रिपोर्ट केला. तेव्हां मद्रा- सचा गव्हर्नर ऑ. रॉबर्ट पॉर्क यानें, नबाबाची कानउघाडणी करून तंजाव रच्या राजास कालव्याचा दुरस्ती करण्याबद्दल परवानगी दिली. ( इ. सन १७६४). त्यामुळे तर अर्काटकर नवाब अधकच चिडून गेला, व तंजावरचें राज्य नामशेष करण्याच्या निरनिराळ्या मसलती योजण्यास त्यानें प्रारंभ केला.

 इतक्यांत म्हैसूरचा हैदरअल्ली हा अतिशय प्रबळ होऊन त्याने कर्नाटकांत एकसारखी धुमश्चका चालविली. इंग्रज व त्यांचा दोस्त कर्नाटकचा नबाब महं- मद अलीखान यांना पादाक्रांत करून कर्नाटकांत आपला अंमल बसवावा या महत्वाकांक्षने त्यानें त्रिचनापल्ली व तंजावर प्रांतापर्यंत स्वान्या करून महंमद 'अल्लांच्या मनांत अतिशय दशहत उत्पन्न केली; आणि तंजावरच्या राज्या- चरही, ही हैदरअल्लीची घाड केव्हां येऊन कोसळेल याचा नियम नसल्यामुळें अहंमदअल्लीप्रमाणेच तुळाजी राजाही अतिशय घाबरून गेला. अशा स्थितीत म्हैसूरकर हैदरअल्लीची स्वारी खरोखरीच तंजावरवर येऊन घडकली. व ज्या अरिष्टाला तुळाजी भीत होता, तेंच अरिष्ट अगदी खरोखरीच त्याच्यासमोर येऊन उभे राहिले. त्यानें पेशव्यांची मदत गुप्तपणानें मागितली, पण ती श्यास मिळाली नाहीं. "इकडे आड तिकडे विहीर " अशी त्याची संकटप्रद स्थिती झाली. कातरांच्या दोन तीक्ष्ण धारेच्या पात्यांत सोपडल्याप्रमाणे स्यास झाले. हैदरअल्ली हा इंग्रज व महंमदअल्ली यांचा कट्टा शत्रू असल्यामुळे, आणि तंजावरकर हे इंग्रज व महंमदअल्ली यांचें स्नेही असल्यामुळे, हैदरअल्लोस खंडणी दिल्यास, इंग्रज व महंमदअल्ली यांचा आपणावर रोष होईल, व त्याचें