पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२१ )

मुलगा उमदत-उलू-उमराव याच्याकडे तहाचे बोलणें लाविलें, व तें नबाबाच्या मुलानें मान्य करून, तुळाजीशी तह केला. त्यांत, तुळाजीनें नाइलाजानें ज्या अटी मान्य केल्या, त्या खाली लिहिल्याप्रमाणे :-  (१) तंजावरच्या राजानें, पेषकशीबद्दल नबाबास दोन वर्षांची बाकी आठ लाख रुपये, आणि लढाईच्या खर्चाबद्दल साडेबत्तीस लाख रुपये मिळून साडेचाळीस लाख रुपये रोख द्यावें.
 (२) तंजावरच्या राजानें, नबाबास मदत लागेल त्या त्या वेळी स्वतःच्या खर्चानें आपलें सैन्य त्याच्या मदतीस पाठवीत जावें.
 (३) तंजावरच्या राजानें, मरवरच्या राजाकडून हनुमंत गडी या नांवाचा जो प्रांत घेतला आहे, तो त्यास परत द्यावा.
 (४) तंजावरच्या राजानें, अरणीची जहागीर व त्रिचनापल्लो प्रांतांतील कांहीं गांव यांजवरील आपला हक्क सोडावा.
 (५) तंजावरच्या राजानें, लढाईच्या खर्चाबद्दल द्यावयाचा ठरलेला साडे- बत्तीस लाख रुपयांचा भरणा रोख केला नाहीं, तर त्यानें मायावरम् द्दा सुभा+ व कुंभकोणम् या सुभ्यांतील कांही प्रदेश या रकमेच्या फेडीसाठी नवाबाच्या स्वाधीन करावा.
 (६) तंजावरचा राजा व अर्काटचा नबाब या उभयतांनी परस्परांचे शत्रु व परस्परांचे मित्र ते परस्परांनी शत्रु व मित्र समजावें.
 (७) अर्काटच्या नबाबानें, बलम्चा किल्ला, येलंगाडू व कोइलाडी, हाँ ठिकाणें तंजावरच्या राजास परत द्यावीं.

 वरील तहांत, – नबाबाने आपला फायदा करून घेण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली असूनही, व इंग्रजामुळेच नबाब विजयी होऊन त्याला है संपत्ती -


 + मायावरम् है शहर तंजावर जिल्ह्यांत तालुक्याचे ठिकाण, व रेलवे स्टेशन असून तें कावेरीनदीच्या कांठी कुंभकोणम्पासून १९ मैलांवर आहे. व कुंभकोणम् हें तंजावरपासून २४ मैलांवर आहे. म्हणजे मायावरम् हें शहर तंजावरपासून अजमार्से ४३ मैलांवर आहे.
२२