पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२२ )

चें घबाड मिळाले असूनही इंग्रजांचा कोठेही उल्लेख न करितां नबाबानें स्यांना अगदीच वगळून टाकिलें; आणि इ० सन १७६२ च्या तहाअन्वयें कर्नाटककर नबाब व तंजावरकर राजे यांच्यामधील, " इंग्रज हे मध्यस्थ " असे ठरले होते. परंतु ह्या इ० सन १७७१ च्या तहानें, नबाबानें, इंग्रजांस न कळविता परभारेंच ही इंग्रजांची मध्यस्थी काढून टाकून तंजावरच्या राजाला पूर्णपणे आपल्या अंकित करून घेतले. शिवाय, नबाबाच्या मुलानें गुप्त रीतीनें स्वतःसाठी व स्वतःच्या भावासाठी ७ लाख रुपयांचा नजराणा वेगळा ठरवून घेतला, आणि ७७ हजार रुपये पेषकशीच्या बाकावरील व्याज घेण्याचे ठरविलें; म्हणजे तंजावरकर तुळाजीगजे याच्याकडून एकंदर ४८ लक्ष, २७ हजार रुपये घेण्याचा ठराव करून त्यापैकी ३ लाख रुपये रोख घेतले. नबाबाची ही स्वार्थपरायणता घुढे उघडकीस येऊन जरी तिचे परिणाम त्याला भावी काळांत भोगावे लागले, तरी तीच नबाबाची स्वार्थ- परायणता वर्तमानकाळांतच तुळाजी राजास अतिशय भोंवली, राजानें मराठ्यांचे साह्य मिळविण्याकरितां त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, ही गोष्ठ इंग्रजांना आवडली नाहीं. त्यामुळे इंग्रजांना राजाचा अतिशय राग आला. राजानें महंमदअल्लोची तुंबडी भरण्यासाठी, वलढाईच्या खर्चाची तोंडमिळ- वणी करण्यासाठी, आपल्या ताब्यांतील नागोर बंदर व इतर कांही प्रांत डच लोकां जवळ गहाण ठेवून कर्ज घेतले, ही गोष्ट इंग्रजांना पसंत पडली नाही. त्यामुळे त्यांच्या रागांत भर पडली व अशा स्थितीत तंजावरचें संस्थान कायम ठेविलें तर त्यापासून कदाचित परक्या युरोपियन राष्ट्रांस त्या राज्यांत प्रवेश करण्यास संधि मिळून एखाद्या वेळीं अनिष्ट परिणाम घडून येईल, अशी त्यांना भीति वाटली; आणि इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आलेल्या कोणत्याही एतद्देशीय राज्य- कर्त्यानें, "इंग्रजांशिवाय, अथवा इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही युरोपियन राष्ट्राशी, कोणत्याही प्रकारचा बिलकुल संबंध ठेवू नये." हें जें हिंदुस्थानांतील इंग्रजांच्या राजनीतीचें आद्यतत्त्व, त्याच तत्त्वाविरुद्ध तुळाजी- राजे वागला, डच लोकांशी व्यवहार केला, हा त्याचा अक्षम्य अपराध आहे, अर्से त्यांना वाटलें तंजावरकराबरोबरील इंग्रजांचा संबंध " मध्यस्थ" या तात्याचा होता; आणि "तंजावरचें राज्य तेथील राजाकडे चालावें" अशा-