पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२३ )

बद्दल इंग्रजांनी हमी घेतलेली होती; परंतु "तंजावरच्या राजानें इंग्रजांशिवाय अथवा इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही युरोपियन राष्ट्राशी कोण त्याही प्रकारचा राजकीय अथवा सांपत्तिक संबंध ठेवूं नये " असा इंग्रजांबरो- बर त्याचा तह झालेला नव्हता अथवा इंग्रजांनीही त्यास या अटीनें बांधून घेतलेले नव्हते. त्यामुळे, " तंजावरकरांनी डच लोकांश व्यवहार केला." या सबबीवर इंग्रजांना तुळाजीराजाचें पारिपत्य करता येणे शक्य नव्हतें. म्हणून त्यांनी " तंजावरच्या राजाकडे खंडणीची मागील बाकी तुंबली " हें निमित्त काढून तंजावरवर सैन्य पाठवून, तंजावरचें राज्य हस्तगत करावें, असें ठर- विलें; व त्याप्रमाणें इंग्रज व महंमदअल्ली या उभयतांनी मिळून तंजावरवर स्वारी केली. त्यांच्यार्शी युद्ध करण्यास तुळाजी राजा अजमार्से २० हजार सैन्य घेऊन पुढे आला. इंग्रज जनरल मि. स्मिथ यानें तंजावरच्या किल्ल्यावर मारा चालविला. तुळाजीराजानें मोठ्या धैर्यानें किल्लयाचा बचाव करण्याचा अयत्न केला, पण तो निष्फळ होऊन जनरल स्मिथ यानें तंजावरचा किल्ला हस्त- गत करून घेतला व त्यावर लागलीच इंग्रजीचें निशाण फडकूं लागलें ( ता. १७ सप्टेंबर, इ. सन १७७३). तुळाजौराजा व त्याचे कुटुंब इंप्र- जांच्या हाती सोपडले. जनरल स्मिथ यानें त्यांना लागलीच अटक करून कैदेत ठेविलें. तंजावरचा प्रांत अर्कोटचा नबाब महंमदअल्ली याच्या स्वाधीन केला; व अशा रीतीने अर्काटकर महंमदअल्ली व मद्रासकर इंग्रज ह्यांची मनीषा तृप्त होऊन, तंजावर संस्थान कांहीं दिवस लुप्तप्राय झालें. 

 तंजावरच्या या इतभागी राज्यासंबंधी, व तेथील दुर्दैवी राज्यकर्त्यां संबंधी त्या काळांतील दुःखद हकीकत अगदी थोडक्यांत बर्णन करावयाची म्हणजे ती अशी आहे कीं, तंजावरचा राजा हा इंग्रज व महंमदअली यांच्या पक्षाचा असल्यामुळे, मुरारराव घोरपडे, फ्रेंच व चंदासाहेब यांनी तंजावरच्या राज्याचें अतीशय नुकसान केले; आणि " तंजावरच्या राजांनी इंग्लिशांची 


 *“ Notwithstanding all these sacrifices made by the Tanjore_Rajas in helping the cause of the English, the Nabab Mahomed Ali cherished & grudge against Tanjore, which was noted for its riches, and the interposition of the English alone succeeded in 1762 in establishing an